Breaking News

ट्रान्सफॉर्मर चोरी प्रकरणी ५ जणांना अटक

5 people arrested in transformer theft case

     फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.९ - फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनने ट्रान्सफॉर्मर चोरीच्या अनुषंगाने फलटण शहरातील डीपी चोरी रेकॉर्ड वरील 1. संतोष जगन्नाथ घाडगे 2. किरण भीमराव घाडगे 3. सागर युवराज घाडगे 4. प्रशांत सुनील जुवेकर सर्व राहणार मलटण ता. फलटण 5. रोहिदास सोपान कदम राहणार चौधरवाडी ता. फलटण यांना अटक केली आहे. दरम्यान ग्रामस्थांनी ज्यांची कनेक्शन डीपी वर आहेत त्यांनीसुदधा जागृत राहून, अचानक लाइट गेल्यास ११२ ला कळवावे, तसेच डीपी तत्काळ चेक करावे व रात्री नविन मोटरसाइकिल, चार चाकी गाडी दिसलेस तात्काळ ११२ नंबरला कळवावे तसेच ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर करावा, 

    अनेक गावात ग्राम सुरक्षा यंत्रणेचा वापर प्रभावी होत नाही, काही गावाची यंत्रणा बंद आहे, तरी ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून करण्यात आले आहे.

    वरील पाचजण फलटण ग्रामिण पोलिस स्टेशन हद्दीत रात्री संशयित रित्या मिळून आले, त्यांच्याकडे अधिक तपास केल्यावर, त्यांनी काही डीपी चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यांचेकडूने गैस सिलेंडर व कॉपर पण जप्त केले आहे, त्यांची सात दिवस पोलिस कोठडी घेतली आहे. त्यांचेकडून आणखीन गुन्हे उघड होणेची शक्यता आहे.

    अजून सुद्धा डीपी चोरणारे गुन्हेगार टोळी आहेत, त्याची माहिती काढणे सुरू आहे, तांबे खरेदी करणारे आणि चोरी करणाराचे नाव द्यावे असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

    सदर कारवाई मा पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक डॉ.वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी  राहुल धस यांचे मार्गदर्शना खाली पो निरीक्षक सुनील महाडीक, शिवाजी जायपत्रे, सपोनि, गुन्हे प्रकटीकरण चे  पो.उप.नी गोपाल बदने, महादेव पिसे, नितीन चतुरे,तात्या कदम, अमोल जगदाळे, हनुमंत दडस यांनी केली.

No comments