हुल्लडबाजी कराल तर पोलीस कारवाईला आमंत्रण ; नववर्षाच्या स्वागतासाठी जिल्हा सज्ज
सातारा (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ३० - सातारा जिल्ह्यात नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली आहे .वाई, पाचगणी ,महाबळेश्वर सह सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर हुल्लडबाजी कराल तर ते महागात पडू शकते .कायदा सुव्यवस्था नियंत्रणाच्या दृष्टीने सातारा जिल्हा पोलिसांनी 97 पोलीस अधिकारी आणि तेराशे तीन कर्मचाऱ्यांची बंदोबस्तासाठी नेमणूक केली आहे आपत्कालीन परिस्थितीसाठी 500 गृहरक्षक नेमण्यात आले आहेत याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली आहे.
तसेच मद्यपी वाहन चालकांच्या तपासणीसाठी 33 ब्रिदिंग अनालायझर यंत्रे तैनात करण्यात आली आहे . सातारा जिल्हा नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे .मावळत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाच्या स्वागतासाठी वाई महाबळेश्वर पाचगणी कोयनानगर बामनोली कास पठार तसेच शिवसागर बॅक वॉटर परिसरातील ग्रामीण भागांमध्ये खाजगी फार्म हाऊस बंगले हॉटेल्स येथे मेजवान्यांचे नियोजन झाले आहे त्यामुळे सातारा जिल्हा पोलिसांनी सुद्धा समाजकंटकांवर नियंत्रण ठेवणे हुल्लडबाजांवर नियंत्रण करून त्यांच्यावर कारवाई करणे कामी बंदोबस्त तैनात केला आहे .जिल्ह्यामध्ये एकूण 97 पोलीस अधिकारी, 1303 पोलीस अंमलदार यांची नेमणूक करण्यात आली आहे याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे तसेच विशेष बाब म्हणून 500 गृह रक्षक नेमण्यात आले आहेत वाहतूक कर्मचाऱ्यांकडे 33 ब्रीदिंग अनालायझर यंत्रे देण्यात आली आहेत ज्याद्वारे मद्यप्राशनं केलेल्या वाहन चालकांवर कारवाई करणे शक्य होणार आहे.
गर्दीच्या बाजारपेठा सार्वजनिक महत्त्वाची ठिकाणे तसेच सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर बारकाईने बंदोबस्त असून पेट्रोलिंग कोंबिंग ऑपरेशन तसेच रात्रगस्त चेक पोस्टवर वाहनांची पडताळणी इत्यादी कारवाया सुरू झाल्या आहेत .याशिवाय डॉल्बी साउंड सिस्टम द्वारे ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर सुद्धा कठोर कारवाई केली जाणार आहे .महिलांची छेडछाड गैरकृत्य अमली पदार्थांचे सेवन सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी या बाबी प्रतिबंधित असून सातारा पोलिसांचे लक्ष राहणार आहे .पाचगणी महाबळेश्वर कास पठार तापोळा बामनोली या पर्यटन स्थळांवर 31 डिसेंबरच्या स्वागतासाठी मोठी गर्दी असणार आहे त्या दृष्टीने सुद्धा यवतेश्वर घाट, महाबळेश्वर, कास या परिसरात चेकिंग पॉईंट राहणार असून वाहनांची कसून तपासणी होणार आहे नव्या वर्षाचे स्वागत शांततापूर्ण पद्धतीने करावे कोणीही हुल्लडबाजी करू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले आहे.
No comments