दारू पिऊन गाडी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२८ - बारामती पुल, फलटण येथे वेडीवाकडी मोटारसायकल चालवणाऱ्या स्वाराची पोलिसांनी ब्रेथ अँनालायझर टेस्ट केली असता, त्यामध्ये स्वाराने दारूचे सेवन केल्याच्या आढळल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहिती नुसार, दि. २७/१२/२०२४ रोजी ७.१६ वाजण्याच्या सुमारास सुरेश आनंदराव भगत, रा. महादेव मंदिराशेजारी विडणी, ता.फलटण हे, बारामती पुल, फलटण येथे सी.डी डिलक्स मोटार सायकल क्र. एम एच ११ सी एल ८३७३ वेडीवाकडी चालवीत असताना मिळुन आल्याने, त्यांची ब्रेथ अँनालायझर इलेक्ट्रीक मशिनने तपासणी करून घेतली असता, त्यांनी दारुचे सेवन केल्याचे मशिनवर प्रमाण दर्शविले. म्हणून त्यांच्यावर मोटार वाहन कायदा कलम १८५ प्रमाणे सरकार तर्फे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
No comments