चक्री जुगार खेळणाऱ्या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१९ - झिरपेगल्ली, मंगळवार पेठ, फलटण येथे बेकायदा बिगरपरवाना संगणकावर पैसे लावुन चक्री जुगार खेळणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, त्या ठिकाणाहून एकूण १६,२४०/- रुपये किंमतीचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १८/१२/२०२४ रोजी १.३५ वाजण्याच्या सुमारास झिरपेगल्ली मंगळवापेठ, फलटण येथे, हनुमान मंदीरा मागील पडक्या घराचे आडोशाला इसम नामे- १) किरण सुनील ननावरे, रा. झिरपेगल्ली, मंगळवार पेठ फलटण ता. फलटण, जि. सातारा. २) बाबा मानसिंग जाधव, रा. तेलीगल्ली, बुधवारपेठ फलटण, ता. फलटण, जि. सातारा हे बेकायदा बिगरपरवाना संगणकावर पैसे लावुन चक्री जुगार खेळत असताना मिळुन आले. याप्रकरणी दोघांच्या विरोधात कारवाई करून, पोलिसांनी एक एलजी कंपनीचा एलईडी स्क्रीन, एक सीपीयू, कीबोर्ड व रोख रक्कम असा एकूण १६ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार पूनम वाघ या करीत आहेत.
No comments