पत्नीचा पती व मुलाच्या विरोधात तर पतीचा पत्नी व मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.26 - धुळदेव 23 फाटा, ता. फलटण येथे पत्नी व धाकट्या मुलाला शिवीगाळ, दमदाटी करुन त्यांना मारहाण केल्याप्रकरणी पती व मुलाचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पतीने देखील पत्नीसह दुसरा मुलगा व मेव्हण्यांच्या विरोधात मारहाण व शिवीगाळीचा गुन्हा नोंद केला आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेले माहितीनुसार, फिर्यादी सुवर्णा अर्जुन ननावरे रा. धुळदेव 23 फाटा, ता. फलटण यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात, दिनांक 25/12/2024 रोजी सकाळी 10.30 वा. चे सुमारास धुळदेव 23 फाटा, ता. फलटण येथे अर्जुन रामचंद्र ननावरे, वय- 52 वर्षे, व सुरज अर्जुन ननावरे, वय 27 वर्षे, दोन्ही रा. फलटण, ता. फलटण यांनी फिर्यादी यांचे शेतातील पाईपलाईन, पिण्याच्या पाण्याची टाकी व पाईप फोडले याबाबत फिर्यादींनी त्यांना विचारणा केली असता, त्यांनी फिर्यादीस शिवीगाळ, दमदाटी करुन त्यांच्या हातातील लोखंडी कोयता घेवुन फिर्यादीच्या अंगावर धावुन आले असता फिर्यादी यांनी हात वरती केला व तो त्यांच्या डाव्या हाताच्या बोटाला लागल्याने त्यांच्या बोटाला जखम होवुन रक्त येवु लागले. तेव्हा फिर्यादींचा लहान मुलगा ऋतिक हा भांडणे सोडविण्यासाठी आला असता त्याला देखील अर्जुन रामचंद्र ननावरे यांनी हाताने मारहाण केली. व सुरज अर्जुन ननावरे याने तेथेच असलेला लोखंडी स्टुल उचलुन फिर्यादी यांच्या अंगावर धावुन आला व त्यांना ढकलुन दिले. तसेच तुझे जे काय असेल ते कायद्याने घे असे म्हणुन त्याने ट्रँक्टरने फिर्यादीच्या शेतातील दोन आंब्याच्या झाडाचे नुकसान केले आहे व फिर्यादीचे घर पाडले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास महिला पोलीस नाईक हेमा पवार याकरिता आहेत.
तर पती अर्जुन रामचंद्र ननावरे, रा. धुळदेव, ता. फलटण यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, दिनांक 25/12/2024 रोजी सकाळी 10.00 वा. चे सुमारास घरातील कांदे भरण्यासाठी टेम्पो घेऊन, धुळदेव येथे गेलो असता, माझ्या टेम्पोला दगड मारुन मला पत्नी सुवर्णा अर्जुन ननावरे व ऋतिक अर्जुन ननावरे यांनी शिवीगाळ केली त्यानंतर त्यांनी माझे मेव्हणे नामे प्रमोद हरीभाऊ आबदागिरे व प्रविण हरीभाऊ आबदागिरे यांना बोलावून घेतले. त्यानंतर माझी पत्नी सुवर्णा अर्जुन ननावरे, मुलगा ऋतिक अर्जुन ननावरे, मेव्हणा प्रमोद हरीभाऊ आबदागिरे व प्रविण हरीभाऊ आबदागिरे यांनी दगडाने, लोखंडी रॉडने व कळक (बांबु) ने मला मारहाण करुन, मला जिवे मारण्याची धमकी दिली. या गुणाचा अधिक तपास महिला पोलीस नाईक पूनम तांबे या करीत आहेत.
No comments