मोटरसायकलला ट्रकची मागून धडक ; एक ठार
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२५ - लोणंद रोडवर, स्मशानभूमीच्या जवळ दुचाकी स्वाराला ट्रकने मागून जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 24/12/2024 रोजी सकाळी 07.30 वाजण्याचे सुमारास कुरेशीनगर, आखरी रस्ता, स्मशानभूमीच्या समोर फलटण - लोणंद जाणाऱ्या रोडवर कदीर निसार कुरेशी वय 35 वर्ष रा.कुरेशीनगर हा त्याची मोटरसायकल नंबर एम एच 11 डी एफ 8615 वरून, फलटण बाजूकडून लोणंद बाजूकडे डांबरी रोडने जात असताना मोटरसायकलच्या पाठीमागून एक अज्ञात ट्रक वरील अज्ञात चालकाने (गाडी नंबर माहित नाही ) जोराची धडक दिली. त्यामुळे कदीर हा मोटरसायकल वरून खाली पडला, त्यांनी हेल्मेट घातले नव्हते, त्यामुळे त्याच्या डोक्याच्या डाव्या बाजूला गंभीर दुखापत झाली. अज्ञात ट्रक वरील अज्ञात चालकाने हयगयीने अविचाराने निष्काळजीपणे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून कदीर यास जोरात धडक देऊन, गंभीर जखमी करून त्याच्या मरणास कारणीभूत झाला आहे. तसेच अपघाताची खबर न देता जखमीस औषधोपचारास घेऊन न जाता ट्रकसह पळून गेला असल्याची फिर्याद निसार बुडन कुरेशी यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश शिंदे हे करीत आहेत.
No comments