मुधोजी महाविद्यालयास नॅक ची ए प्लस श्रेणी
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.४ - फलटण एज्युकेशन सोसायटी च्या मुधोजी महाविद्यालयाने नॅक च्या चौथ्या पुनर्मल्यांकनात ए प्लस ही श्रेणी प्राप्त केली. 30 सप्टेंबर व 1ऑक्टोबर रोजी आलेल्या समितीमध्ये चेअरमन म्हणून बेंगलोर नॉर्थ युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ.निरंजना बेनाली, मेंबर कॉर्डिनेटर म्हणून गोरखपुर विद्यापीठाचे डॉ.पाठक तर मेंबर म्हणून कोईमतुर चे डॉ.शिवाकुमार यांचा सहभाग होता. दोन दिवसाच्या गुणवत्ता तपासणी मध्ये त्यांनी अभ्यासक्रम, अध्ययन अध्यापन व मूल्यमापन पद्धती, संशोधन विकास व विस्तार सेवा, पायाभूत विकास व अत्याधुनिक अध्यापन तंत्रे, विद्यार्थ्यांची प्रगतीशीलता व रोजगार क्षमता, महाविद्यालयाचे प्रशासन व व्यवस्थापन आणि महाविद्यालयाचे पर्यावरण समतोलातील योगदान, नवोपक्रम, महाविद्यालयाचे वेगळेपण याबाबतचे निकष प्रत्यक्ष पाहणी करून तपासले असता त्यांनी महाविद्यालयाची गुणवत्ता अतिउच्च असल्याचे निरीक्षण नोंदवले. तसेच यापुढे महाविद्यालय स्वायत्त होऊ शकेल तसेच नजीकच्या काळात क्लस्टर युनिव्हर्सिटी म्हणून कार्य करण्यास सक्षम असल्याचे आपल्या अहवालामध्ये नोंदविले आहे. तसेच यापुढे महाविद्यालयाने रोजगार क्षम कोर्सेस राबवावेत , प्राध्यापकांनी उच्च दर्जाचे संशोधन करावे व ते समाज उपयुक्त असावे असे म्हटले आहे. महाविद्यालयाने आपल्या 28 एकराच्या परिसरामध्ये स्वतंत्र 9 इमारतीमध्ये विविध विभाग प्रशस्तपणे कार्यरत ठेवले आहेत. विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या पायाभूत सुविधा चा दर्जा सुधारला आहे, विशेष करून क्रीडा, कला, एनसीसी व ग्रंथालय सुविधा अत्यंत प्रशस्त स्वरूपाच्या असून समितीने त्याचा गुणगौरव करून काही उणीवा दूर करण्यासाठी उपाय योजना सुचवल्या आहेत. महाविद्यालयाच्या गुणवत्ता सुधार प्रकल्पामध्ये फलटण एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापनाने विशेष लक्ष केंद्रित करून पायाभूत संरचना विकास व प्रयोगशाळांचे नूतनीकरण केले तसेच काही प्रमाणात शिक्षक व शिक्षकेतर यांची विहित पद्धतीने नियुक्ती केली. त्यामुळे त्यांच्या काळातही फलटण तालुका व आजूबाजूच्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची एक चांगली संधी मिळालेली आहे. या समितीबरोबर चर्चा करण्यासाठी व्यवस्थापनाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर तसेच संस्थेचे ट्रेझरर हेमंत रानडे, महाविद्यालय विकास समितीचे समितीचे कार्य कुशल सदस्य डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, अरविंद मेहता व संस्थेचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम सहभागी झाले होते. त्याबरोबरच समितीच्या भेटीदरम्यान गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या. ३० सप्टेंबर २२०४ रोजी नॅक कडून श्रेणी जाहीर करण्यात आली. ए प्लस या उचित श्रेणीमुळे महाविद्यालयाने फलटण एज्युकेशन सोसायटीचा व शिवाजी विद्यापीठाचा गुणवत्तेचा आलेख नक्कीच उंचावलेला आहे.मुधोजी महाविद्यालय हे फलटण एज्युकेशन सोसायटीचे शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात प्रथम पाच अग्रगण्य महाविद्यालयात स्थान असणारे, एक महत्त्वाचे उच्च शिक्षणाचे केंद्र असून स्वतः श्रीमंत संजीवराजे सेक्रेटरी साहेब, फलटण एज्युकेशन सोसायटी हे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. तालुक्यातील एकमेव दर्जेदार पारंपरिक व व्यावसायिक शिक्षण देणारे महाविद्यालय असल्याने या महाविद्यालयाची गुणवत्ता व नावलौकिक अतिशय महत्त्वाचा ठरतो. महाविद्यालयाच्या गुणवत्तेची उंची या नॅक ए प्लस मूल्यांकनामुळे निश्चितच वाढलेली आहे. ही उंची गाठण्यात आम्हाला यश मिळाले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. व्यवस्थापन, विद्यापीठाचे प्रतिनिधी, शासनाचे प्रतिनिधी, माजी विद्यार्थी, पालक, आजी विद्यार्थी यांच्या चांगल्या अभिप्रायाबद्दल व कौतुका मुळे आम्हाला निश्चितच आणखीन प्रेरणा मिळेल. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी. एच.कदम व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे डॉ. टी. पी. शिंदे, तसेच सर्व क्रायटेरिया चेअरमन आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर वर्गाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे त्याबद्दल आम्ही सर्वांचे मनःपूर्वक आभारी आहोत.
No comments