न्यायाधीश लाच प्रकरणातील खाजगी इसम निघाला पोलीस कर्मचारी
सातारा दिनांक 14 (प्रतिनिधी) - जामीन मंजूर करून घेण्यासाठी पाच लाखांची लाच मिळवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह इतर तिघांवर गुन्हा नोंद झाला आहे. यामधील खाजगी इसम किशोर खरात हे मुंबई पोलीस दलामध्ये सहाय्यक फौजदार असल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच न्यायाधीश निकम यांच्या साताऱ्यातील घराची तपासणी करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्या वतीने देण्यात आली आहे.
या विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला किशोर खरात हे खाजगी इसम असल्याचे समोर आले होते. मात्र तपासा दरम्यान खरात हे मुंबईतील वरळी येथे पोलीस दलात सहाय्यक फौजदार असल्याचे स्पष्ट झाले आहे . त्यांच्याबद्दल अधिक माहिती घेण्यात येत आहे. न्यायाधीश धनंजय निकम यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आलेला आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुढील कारवाई करणार असल्याची माहिती आहे. न्यायाधीश निकम यांच्या साताऱ्यातील घरातही विभागाने पाहणी केली मात्र तेथे काही आढळून आलेले नाही.
No comments