नीरा उजवा कॅनॉल येथे आंघोळीला गेलेला युवक बेपत्ता
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१३ - यशवंतराव चव्हाण कॉलेज परिसरात नीरा उजवा कॅनॉल येथे आंघोळीला गेलेला २३ वर्षीय युवक बेपत्ता झाल्याची फिर्याद देण्यात आली आहे.
फलटण पोलिस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ११/१२/२०२४ रोजी दुपारी २३ वाजण्याच्या सुमारास यशवंतराव चव्हाण कॉलेज परिसरात नीरा उजवा कॅनॉल येथून इरसाद समशेर अली वय २३ वर्षे,मुळ रा.पहाडपुर, ता.कोलोनेल्गंज, जि.गोंडा, राज्य- उत्तरप्रदेश हे आंघोळीला गेले असता तेथुन कोणास काहीही न सांगता कोठेतरी निघुन गेले आहेत, ते अदयाप पर्यंत परत आले नाहीत. सदर व्यक्ती कॅनाल मधे वाहून गेल्याची शक्यता आहे असल्याची फिर्याद बेपत्ता युवकाचा मेहुना सहाबान बल्ले अली वय २५ वर्षे, व्यवसाय- मजुरी, मुळ रा. तुलसी पुर, ता.कोलोनेल्गंज, जि.गोंडा, राज्य- उत्तर प्रदेश, सध्या रा.चांदणी चौक, मुळशी, जि.पुणे याने दिली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार पूनम वाहक या करीत आहेत.
रंग -गोरा, उंची 5 फुट, अंगाने सडपातळ, नाक – सरळ, केस- काळे, अंगात नेसणेस – पांढऱ्या व निळ्या रंगाचा लायनिंगचा फुल बाह्यांचा शर्ट, हिरव्या रंगाची नाईट पँन्ट, भाषा - हिंदी बोलतात असे वर्णन बेपत्ता युवकाचे आहे.
No comments