धुळदेव येथे घरफोडी ; 20 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल चोरीला
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२७ - धुळदेव ता. फलटण येथे घराचा कडी कोयंडा तोडून, घरातील रोख रक्कम व सोन्याची अंगठी असा एकूण 20 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 25/12/2024रोजी दुपारी 11.00 वा चे सुमारास ते दिनांक 26/12/2024रोजी दुपारी 12.00 वाजण्याच्या दरम्यान, 23 फाटा धुळदेव ता.फलटण जि.सातारा येथील सुवर्णा अर्जुन नणावरे यांच्या राहत असलेल्या घराचे कोणीतरी अज्ञात इसमाने कुलूप कडी, कोयंडा कशाचे तरी साहय्याने तोडुन, घरात प्रवेश करून, बेडरुम मध्ये ठेवलेल्या पर्स मधील 11हजार 700 रुपये रोख रक्कम व सोन्याची अंगठी साहित्य असे एकुण 20,700/- रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश शिंदे हे करीत आहेत.
No comments