Breaking News

श्रीमंत विश्वजीतराजे यांच्या वाढदिवसा निमित्त विद्यार्थिनींना सायकल वाटप

Distribution of bicycles to students on the occasion of Srimanta Vishwajitaraj's birthday

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२३ - श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसा निमित्ताने आज सासवड येथे सासवड गावचे युवा नेते युवा उद्योजक अमोल शिवाजीराव रासकर यांच्या वतीने महात्मा फुले हायस्कूल व जुनिअर कॉलेज सासवड येथील विद्यार्थिनींना सायकल व खाऊ वाटप करण्यात आला.

    श्री अमोल रासकर यांच्या माध्यमातून गेल्या पाच सहा वर्षापासून सासवड गावातील आर्थिक परिस्थिती हालाकीची असणाऱ्या १६ विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांचा शैक्षणिक खर्च करण्यात येत असून, त्यातील काही दहावी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थीनी 2-3 किमी वरून शाळेत चालत येत असत, त्यामुळे याची दखल घेऊन व श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री अमोल रासकर यांनी स्वखर्चाने या विद्यार्थिनींना सायकली वाटप केल्या. यावेळेस सासवड गावचे माजी सरपंच श्री पांडुरंग जाधव, श्री मधुकर भुजबळ मा.व्हाईस चेअरमन सासवड विकास सेवा सोसायटी,श्री पंढरीनाथ जाधव माजी सदस्य,श्री आबा खताळ मा. सदस्य,श्री नवनाथ जगताप, श्री संतोष जाधव, जितू काकडे, नवनाथ सुळ, अजित कारंडे, सागर सुळ, सचिन रासकर,चेतन जाधव तसेच ग्रामस्थ आणि महात्मा फुले हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य व सर्व स्टाफ आणि विद्यार्थी उपस्थित होते.

No comments