फलटण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
फलटण (प्रतिनिधी) -भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फलटण येथे आमदार सचिन पाटील यांनी अभिवादन केले. यावेळी मा. नगरसेवक सचिन अहिवळे, सामाजिक कार्यकर्ते अमीरभाई शेख, राजेश हेंद्रे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी रिपाइंचे मधुकर काकडे पश्चिम महाराष्ट्र संघटक, विजय येवले जिल्हा सचिव, राजू मारुडा जिल्हा उपाध्यक्ष, मुन्ना शेख जिल्हा सेक्रेटरी, संजय निकाळजे जिल्हा कार्यकारणी सदस्य, सतीश अहिवळे अध्यक्ष फलटण तालुका, लक्ष्मण अहिवळे अध्यक्ष फलटण शहर आदी पदाधिकारी कार्यकर्ते यांनीही यावेळी अभिवादन केले.
No comments