Breaking News

संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Insulting the Constitution will not be tolerated' – Chief Minister Devendra Fadnavis

    नागपूर, दि. 16 : बीड, परभणी येथील घडलेल्या दोन्ही घटना गंभीर आहेत. या घटनांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी असून संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

    मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार अपेक्षित चर्चा सभागृहात झाली पाहिजे. संविधानाचा अपमान करणारा व्यक्ती मनोरुग्ण होता. विरोधी पक्षाने राजकारण न करता अशा घटना घडू नयेत यासाठी चांगल्या सूचना मांडाव्यात, अशी अपेक्षा देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

    विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्थगन प्रस्तावादरम्यान सविस्तर चर्चा करण्यात येईल, असे सांगितले.

No comments