धुळदेव येथून जेसीबी चोरीला
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२३ - मौजे भिवरकरवाडी, धुळदेव गावचे हद्दीतून २ लाख रुपये किंमतीचा जे.सी.बी. चोरून नेल्याप्रकरणी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार,दिनांक 19/12/2024 रोजी संध्याकाळी 6.30 वाजता ते दिनांक 20/12/2024 रोजी सकाळी 09.00 वाजण्याच्या दरम्यान, मौजे भिवरकरवाडी पोस्ट धुळदेव गावचे हद्दीत तुळजाई मंगल कार्यालयाचे पाठीमागे,
२ लाख रुपये किमतीचा एक पिवळया रंगाचा जे.सी.बी. 3 डिएक्स मॉडेलचा 2007 तिचा आर.टी.ओ.क्रमांक के.ए.9 झेड 4395 असा असलेला जेसीबी कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेला असल्याची फिर्याद भारत हिरासिंग राठोड, वय 38 वर्षे, व्यवसाय ड्रायव्हर, मुळ रा.मंदेवाल, ता.जिवरगी, जिल्हा. गुलबर्गा, राज्य- कर्नाटक, सध्या रा.कोळकी, फलटण यांनी दिली आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक पूनम तांबे या करीत आहेत.
No comments