शपथविधी नंतर साताऱ्यात जल्लोष ; भाजप कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी
सातारा (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१५: भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, यांच्यासह आमदार मकरंद पाटील व आमदार शंभूराजे यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. महायुतीच्या या घवघवीत यशाबद्दल भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तसेच साताऱ्यात बाबाराजे समर्थकांनी जोरदार जल्लोष केला, येथील सातारा शहरांमध्ये ठिकठिकाणी तसेच भारतीय जनता पार्टीच्या विसावा नाका येथील कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरून अभिनंदन केले चार वाजल्यापासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते टीव्ही संचासमोर शपथविधीच्या थेट सोहळ्याच्या प्रक्षेपणाकरिता बसले होते 39 मंत्र्यांच्या शपथविधी मध्ये 17 व्या क्रमांकावर शंभूरा देसाई तर 21 व्या क्रमांकावर आमदार शिवेंद्रसिंह राजे 24 व्या क्रमांकावर आमदार जयकुमार गोरे त्यानंतर आमदार मकरंद पाटील यांनी अनुक्रमे शपथ घेतली मी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले ईश्वर शपथ घेतो की असे वाक्य उच्चारले जातात नागपूरमध्ये पोहोचलेल्या शिवेंद्रसिंह राजे समर्थकांनी राजभवनाच्या प्रांगणामध्ये एकच जल्लोष केला तसेच साताऱ्यामधील राजे समर्थकांच्याही उत्साहाला उधाण आले होते. साताऱ्यात ठिकठिकाणी रात्री उशिरा शिवेंद्रसिंहराजेंच्या अभिनंदनचे फलक झळकायला सुरुवात झाली होती. महायुतीने जिल्ह्यात घवघवीत यश मिळवले तसेच मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सुद्धा महायुतीचा बोलबाला राहिला आमदार मकरंद पाटील आमदार जयकुमार गोरे आमदार शंभूराजे यांनी सुद्धा मंत्रीपदाची शपथ घेतली. महायुतीच्या या धवल यशाबद्दल भाजपच्या जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील स्वराज्य विकास गोसावी सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार उपाध्यक्ष राहुल शिवनामे यांनी विसावा नाका येथील कार्यालयासमोर येऊन फटाक्यांची आतिषबाजी केली तसेच एकमेकांचे अभिनंदन करण्यात आले भाजप कार्यकर्त्यांनी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मिठाईवाटप केले.
No comments