Breaking News

फलटण येथे महायुतीचा शपथविधी सोहळा ऑनलाइन ; फलटणमधील अडथळ्यांची शर्यत संपलीय - समशेरसिंह नाईक निंबाळकर

Mahayuti swearing-in ceremony online at Phaltan; Steeplechase in Phaltan is over - Samsher Singh Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.५ - देवेंद्र फडणवीस सरकारचा शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण फलटण येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्क्रीनवर करण्यात आले होते. आज सायंकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री व अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर फलटण येथे जिलेबी भरवून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी समशेरसिंह नाईक निंबाळकर,अनुप शहा, अशोक जाधव, सचिन अहिवळे व इतर मान्यवर उपस्थित होते.

    यावेळी बोलताना समशेरसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, आज महायुतीचे सरकार पुन्हा एकदा सत्तेत आले असून, आज सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता हा फलटण कोरेगाव विधानसभेवर निवडून गेलेला आहे. फलटणमधील धोम बलकवडी, निरादेवघरची कामे,फलटण बारामती रेल्वे, फलटण पंढरपूर महामार्ग व फलटण शहरातील इतर प्रश्न मागील दहा वर्षात सोडवता आले असते परंतु जाणीवपूर्वक प्रश्न सोडवले गेले नाहीत, आता फलटणमधील अडथळ्याची शर्यत संपली आहे, आता कायद्याचे - न्यायाचे राज्य फलटणमध्ये निर्माण झाले असून, येणाऱ्या काळात प्रलंबित प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. आज देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आनंद झाला असून फलटणकरांच्या वतीने नवीन सरकारचे अभिनंदन.

No comments