Breaking News

आपली फलटण मॅरेथॉनच्या बक्षीस समारंभास महेश मांजरेकरांची उपस्थिती

Mahesh Manjrekar's presence at the prize ceremony of our Phaltan Marathon

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१ - जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त दर वर्षी आपण आपली फलटण मॅरॅथॉन चे आयोजन करत असतो. या वर्षी ७ वे वर्ष आहे . दर वर्षी लोकांचा उत्साह वाढतच आहे. लोकांना व्यायामाची सवय लागावी , सगळ्यांचे आरोग्य उत्तम राहावे या शुद्ध हेतूनेच आपण ही मॅरॅथॉन सुरू केली आहे. दर वर्षी आपण एक मोठी हस्ती बोलावून त्यांचे सर्वांना मागदर्शन आणि त्यांच्या हस्ते मॅरॅथॉन ची बक्षीस वाटप असा उपक्रम आपण घेत असतो. आत्ता पर्यंत डॉ शरद हर्डीकर, स्वर्गीय सिंधुताई सपकाळ, आयपीएस विश्वासराव नांगरे पाटील, खासदार अमोल कोल्हे, डॉ प्रकाश बाबा आमटे, सौ मंदाकिनी आमटे , कीर्तनकार चारुदत्त आफळे, आयपीएस कृष्ण प्रकाश या सर्व लोकांनी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे. यावर्षी आपल्याला लाभले आहेत - नाटककार, अभिनेता, दिग्दर्शक, चित्रपट निर्माता, बिग बॉस फेम आणि सेलिब्रिटी श्री महेश मांजरेकर. श्रोत्यांना संबोधित करण्यासाठी आणि विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यासाठी सन्माननीय अतिथी म्हणून ते उपस्थित राहणार आहेत, तसेच  दि. ५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ६ वाजता सजाई गार्डन येथून सुरू होणाऱ्या "आपली फलटण मॅरॅथॉन २०२४-२५ " चा फ्लॅग ऑफ महेश मांजरेकर व इतर मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याची माहिती डॉ. प्रसाद जोशी यांनी दिली.

    आपली फलटण मॅरेथॉन ३ प्रकारामध्ये पुरुष व महिला असे प्रत्येकी पाहिल्या तीन क्रमांकांना  मान्यवरांच्या बक्षिसे हस्ते दिली जाणार आहेत.
पहिले बक्षीस :- ₹१००००, दुसरे बक्षीस :- ₹७०००, तिसरे बक्षीस:- ₹५०००. अशी सर्व मिळून १८ बक्षिसे दिली जाणार आहेत. मॅरॅथॉन पूर्ण करणाऱ्यांना आकर्षक फिनिशर मेडल दिले जाणार आहे. तसेच भाग घेणाऱ्या रनरानर्सना प्रत्येकी एक मॅरॅथॉन किट दिले जाणार आहे , की ज्या मध्ये टाईम चीफ बिब, टीशर्ट, एनर्जी बार , टोपी आणि एक सरप्राईज गिफ्ट असणार आहे. तरी मित्रांनो आपली फलटण मॅरॅथॉन २०२४-२५ मध्ये आपला सहभाग नोंदवा आणि तुमच्या आयुष्याचा निरोगी आणि आनंदी प्रवास सुरू करा असे आवाहन डॉ. प्रसाद जोशी यांनी केले.

    नोंदणी करण्यासाठी www.joshihospitalpvtltd.com या वेबसाईट ला जरूर भेट द्या. नोंदणी शुल्क ₹७५०/- फक्त. नोंदणीची अंतिम तारीख २० डिसेंबर २०२४ ही आहे.

No comments