Breaking News

आमदार सचिन पाटील यांची अंकुर सिडसला भेट

MLA Sachin Patil's visit to Ankur Sidus

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२० -  नागपुर हिवाळी अधिवेशनाच्या, व्यस्त कामकाजातुन आमदार सचिन पाटील यांनी, देशातील शेतकऱ्यांच्या मनावर ठसा ऊमठवलेल्या

    “अंकुर सिडस” या कंपनीच्या सुमारे दीडशे एकरातील, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रयोगशाळेला भेट दिली. त्याच बरोबर अंकुर सिडसच्या अद्यावत प्रयोग शाळेतील रोबोटीक बिजरोपन व निरोगी बियाणे, तसेच व्हाइरस प्रतिबंध, रोगप्रतिरोधक बिज उत्यादन, तसेच पिक प्रात्यक्षिक प्लाॅट व उत्यादन माहीती व शेतकरी उपयोगी उत्पादनाची माहीती घेवुन, फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना अंकुर सिडसच्या मार्फत कसा फायदा होऊ शकतो.

    तसेच आगामी काळात शेती कशा पध्दतीने होवु शकेल याची अंकुरच्या तज्ञांकडून माहीती घेवुन, शेतकरी व शेती उत्पादनात वाढ होवुन शेतकऱ्याचे  उत्पन्न व जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न करण्यासंदर्भात चर्चा केली. त्याबरोबरच सौर उर्जा प्रकल्प व मायक्रोन्युर्ट्रलस प्लान्ट विषयी माहीती घेतली. यावेळी आमदार सचीन पाटील यांच्या समवेत श्री.विजय कदम,फलटण तालुकाप्रमुख श्री.नानासो इवरे,गोखळीचे तंटामुक्ती अध्यक्ष श्री.मनोज गावडे, विशाल माने,अमोल पवार,कटनी जिल्हा भाजप कोषाद्यक्ष सीए अर्पित आग्रवाल उपस्तिथ होते.

    मा. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नागपुर येथील मित्र व “अंकुर सिडस्” चे मालक वैभव दादा काशीकर यांनी, आ. सचिन पाटील व सहकाऱ्यांना विविध विषयांवर माहीती दिली.

    या वेळी कापूस, तूर, घेवडा, टोमॅटो, भेंडी मिरची या विविध पिकांच्या प्लॉटला भेट देऊन, पिकाच्या रोगप्रतिबंधक उत्पादन अशा विविध विषयांवर चर्चा केली.

No comments