ट्रान्सफॉर्मर चोरी व एसटी आगार तक्रारीबाबत मा.खा.रणजितसिंह व आ.सचिन पाटील यांनी घेतला आढावा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. 12 - ट्रान्सफॉर्मरची होणारी चोरी थांबवण्यासाठी प्रयत्न करा, या साठी ग्रामसुरक्षा दल व सीसीटीव्ही कॅमेरा यांची मदत घ्या, तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती पंपासाठी अखंडीत वीज पुरवठा करा आशा सूचना दिल्या, तसेच एसटी डेपोची वाईट अवस्था सुधारणार असल्याचे मा. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना देताना सांगितले.
फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील महावितरणचे रोहित्र वारंवार चोरी होतात यावर नियंत्रण आणण्यासाठी व वीज वितरण कंपनीच्या विविध अडचणी जाणून घेण्यासाठी फलटण येथील तहसिल कार्यालय येथे आमदार सचिन पाटील व माजी खासदार रणजितसिंह ना निंबाळकर यांनी आढावा बैठक घेतली. यामध्ये विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
मागील अनेक दिवसांपासून फलटण तालुक्यात विविध भागातून विशेषतः ग्रामीण भागातून रोहित्र चोरीला जाण्याच्या अनेक घटना घडल्या सन २०२३ -२४ या एका वर्षात १५७ रोहित्रांची चोरी झाली ही संख्या दरवर्षी पेक्षा दुपट्ट झाल्याने चिंता वाढली आहे ज्या ठिकाणचे रोहित्र चोरीला जातात त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना वीज नसल्याने शेतातील पिकांना पाणी उपलब्ध असून पाणी देता येत नाही जनावरांच्या पाण्याचे हाल होतात असे चोरीला गेलेले रोहित्र बसवण्यासाठी खूप वेळ जातो त्या मुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत असल्याचे आमदार सचिन पाटील यानी स्पष्ट केले.
आढावा बैठकीसाठी फलटण चे प्रांताधिकारी सचिन ढोले , तहसिलदार डॉ अभिजित जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस , फलटण ग्रामीण चे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक फलटण महावितरणचे वरिष्ठ अभियंता प्रदीप ग्रामोपाध्याय यांच्यासह महावितरणचे शाखा अभियंता व अधिकारी उपस्थित होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते व माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले , बजरंग गावडे , अभिजीतभैय्या नाईक निंबाळकर ,अशोकराव जाधव, अमित रणवरे, प्रदीप झणझणे इत्यादी उपस्थित होते.
No comments