मुधोजी महाविद्यालयास विभागीय कुस्ती फ्री स्टाईल प्रकारात सुवर्णपदक
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ८ - स्व.बाळासाहेब देसाई महाविद्यालय, पाटण येथे शिवाजी विद्यापीठ अंतर्गत झालेल्या सातारा विभागीय कुस्ती पुरुष स्पर्धा, सन २०२४-२५ मध्ये फ्री स्टाईल क्रीडा प्रकारात पै.सुरज गोफणे याने ६१ कि.लो.वजनी गटात सुवर्णपदक, प्रथम क्रमांक मिळविला. तसेच पै.सुरज गोफणे'ने उत्कृष्ट कुस्तीचे प्रदर्शन करुन सर्व प्रेक्षकांची मने जिंकली.
याबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम सर, मुधोजी महाविद्यालय प्राचार्य डॉ.पी.एच.कदम सर यांनी सर्व संघाचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
No comments