Breaking News

मुधोजी हायस्कूलच्या मुलींच्या हॉकी संघाने रचला इतिहास ; सलग तिसऱ्या वर्षी राज्यस्तरिय विजेतेपद

Mudhoji High School girls hockey team makes history; State title for the third year in a row

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. 7 -  इस्लामपूर येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेमध्ये मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुलींच्या संघाने सलग तिसऱ्या वर्षी 14 वर्षाखालील वयोगटांमध्ये विजेतेपद पटकाऊन नेत्र दीपक खेळाचे प्रदर्शन करत उलेखनीय कामगिरी केली आहे. एका वयोगटामध्ये एकाच शाळेच्या संघाने सलग तीन वेळा राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला अशी कामगिरी करनारी ही एकमेव शाळा आहे. अशी कामगिरीची ही पहिलीच वेळ आहे.

    या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेमध्ये पहिला सामना लातूर विभागा विरुद्ध झाला हा सामना 6-0 असा एकतर्फी जिंकून या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठ ली.. स्पर्धेचा उपांत्य सामना नाशिक संघ विरुद्ध झाला हा सामना देखील 5-0 गोल फरकाने जिंकून स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. स्पर्धेचा अंतिम सामना हा पुणे विरुद्ध झाला. हा सामना देखील 4-0 ने जिंकून सलग तिसऱ्या वर्षी सुवर्णपदक पटकावले.

    या संपूर्ण स्पर्धेमध्ये वेदिका वाघमोरे, गायत्री खरात, अनघा केंजळे, केतकी बोले, इशिका करणे यांनी आघाडी फळीमध्ये इस्लामपूर येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेमध्ये मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुलींच्या संघाने सलग तिसऱ्या वर्षी 14 वर्षाखालील वयोगटांमध्ये विजेतेपद मिळवून नेत्र दीपक कामगिरी केली आहे. एका वयोगटामध्ये एकाच शाळेच्या संघाने सलग तीन वेळा राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला ही पहिलीच वेळ आहे.

    या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेमध्ये पहिला सामना लातूर विभागा विरुद्ध झाला हा सामना 6-0 असा एकतर्फी जिंकून या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठ ली.. स्पर्धेचा उपांत्य सामना नाशिक संघ विरुद्ध झाला हा सामना देखील 5-0 गोल फरकाने जिंकून स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. स्पर्धेचा अंतिम सामना हा पुणे विरुद्ध झाला. हा सामना देखील 4-0 ने जिंकून सलग तिसऱ्या वर्षी सुवर्णपदक पटकावले. या संपूर्ण स्पर्धेमध्ये वेदिका वाघमोरे, गायत्री खरात, अनघा केंजळे, केतकी बोळे , इशिका कर्णे यांनी आघाडी फळीमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून गोल नोंदवले या आघाडी फळीमध्ये तनिष्का लोंढे, दूर्वा साळुंखे, ध्रुवी फडतरे, आराध्या सपाटे , साक्षी चव्हाण यांनी देखील चांगले खेळाचे प्रदर्शन केले. मधल्या फळीमध्ये मानसी पवार, गौरी हिरनवाळे, श्रावणी ननवरे,, वेदिका सोनवणे, नंदिनी शिंदे यांनी देखील उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. तसेच बचाव फळीमध्ये मृण्मयी घोरपडे, आर्या महांगडे व गोलकीपर आरोही पाटील यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या संघामध्ये साक्षी चव्हाण, दूर्वा साळुंखे, ध्रुवी फडतरे, तनिष्का लोंढे व आराध्या सपाटे यांनी देखील आघाडी फळीमध्ये चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले.

    या स्पर्धेमधून महाराष्ट्र संघ निवडण्यात आला यामध्ये सलग दुसऱ्या वर्षी कुमारी वेदिका वाघमारे कुमारी मानसी पवार यांची महाराष्ट्र संघामध्ये निवड झाली तसेच आरोही पाटील व मृण्मयी घोरपडे यांची पहिल्यांदा निवड झाली आहे.

    या संपूर्ण राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेमध्ये मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या 14 वर्षाखालील मुलींच्या संघाने निर्विवाद वर्चस्व राखले  व सर्व स्पर्धेमध्ये विरोधी संघाचा एकही गोल होऊन दिला नाही हा देखील एक नवीन विक्रम या संघाने केलेला आहे.

    या सर्व यशस्वी खेळाडूंना ज्येष्ठ हॉकी मार्गदर्शक  महेश खुटाळे , मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे हॉकी प्रशिक्षक सचिन धुमाळ तसेच संघाचे व्यवस्थापक श्री बी.बी खुरंगे व धनश्री क्षीरसागर यांचे मार्गदर्शन लाभले.

    विजेता संघातील यशस्वी खेळाडू व त्याना मार्गदर्शन करणारे क्रीडा प्रशिक्षक यांचे विधान परिषदेचे माजी अध्यक्ष मा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर ,माजी आमदार दिपक चव्हान, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मा श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर महाराष्ट्र खो -खो असोसिएशनचे  अध्यक्ष मा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,क्रीडा समितेचे अध्यक्ष शिवाजीराव घोरपडे ,क्रीडा समितीचे सदस्य महादेवराव माने ,संजय फडतरे,प्रशासन अधिकारी अरविंद निकम ,प्राचार्य सुधीर अहिवळे फलटण एज्युकेशन सोसायटी च्या नियामक मंडळाचे सदस्य व  विविध मान्यवर यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

No comments