फलटण शहरासाठी नवीन सब स्टेशन ; मा. खा रणजितसिंहांच्या मागणीला मुख्यमंत्र्यांची मंजुरी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.11 - फलटण शहरामध्ये वारंवार होणाऱ्या खंडित विद्युत पुरवठ्याची समस्या व शहरातील उघड्यावरील वायरिंगच्या जाळ्यांमुळे अपघात होत असल्याने, फलटण शहरासाठी स्वतंत्र सब स्टेशन व शहरातील उघड्यावरून होणाऱ्या वायरमधून होणारा विद्युत पुरवठा, भूमिगत करण्याची मागणी मा. खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असता एका दिवसातच मागणी मंजुर करण्यात आली आहे.
मा. खा रणजितसिंह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या मागणी पत्रात असे म्हटले आहे की, फलटण शहरा मध्ये वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण जास्त असून, कोठेही व कोणत्याही ठिकाणी फॉल्ट झालेस पूर्ण शहरामधील विद्युत पुरवठ्यावर परिणाम होत आहे विद्युत पुरवठा सतत बंद होतो. जिंती नाका (उत्तर बाजूस) या ठिकाणी फॉल्ट झाला तर विमानतळ (पश्चिम बाजू), दक्षिण व पूर्व बाजूचा सुद्धा विद्युत पुरवठा खंडित होत आहे. जाधववाडी पासून ते पुढे जिंतीनाका पासून ते लोणंद रोड पर्यंतचा संपूर्ण भाग या 22KV फलटण फिडर वर पूर्णतः अवलंबून आहे. तसेच शहराचा पूर्व भाग हा 22KV वाय.सी फीडरवर अवलंबून आहे. तसेच फलटण शहर मध्ये विद्युत जाळे एच टि/एल टी लाईन खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वारंवार - अपघात होत आहेत.
जर संपूर्ण शहरांतर्गत अंडरग्राउंड विद्युत वाहिनी - (केबल) टाकलेस विद्युत पुरवठा खंडित होणार - नाही व अपघातांचे प्रमाण पण कमी होईल व - वाढत्या फलटण शहराचा विचार करता सदर बाब - लवकरात लवकर अस्तित्वात येऊन कार्यान्वित होणे गरजेचे आहे. तरी फलटण शहरासाठी नविन - उपकेंद्र व संपूर्ण फलटण शहरामध्ये अंडरग्राउंड केबल करण्याबाबत तात्काळ संबंधितास योग्य त्या सुचना देण्यात याव्यात.
तसेच सदर प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी महावितरण मुख्य कार्यालय, प्रकाशगढ, मुंबई यांचेकडे बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असून या प्रस्तावास - तत्काळ मंजूरी मिळून निधी उपलब्ध करून देण्याकामी विनंती केली होती याला मुख्यमंत्र्यांनी - तत्काळ एका दिवसात मंजुरी दिली असल्याचे मा. - खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
No comments