Breaking News

फलटणच्या श्रीराम रथोत्सवात नवमहाराष्ट्र गणेशोत्सव मंडळाची अखंडित सेवा

Non-stop service of Navmaharashtra Ganeshotsav Mandal in Sriram Rathotsav of Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. 5 -: येथील ऐतिहासिक पार्श्‍वभूमी असलेल्या फलटणच्या श्रीराम रथोत्सवादरम्यान श्रीराम प्रभूंच्या रथाच्यापुढे विद्युत रोषणाईची सुविधा देण्याची अखंडित सेवा शहरातील बुधवार पेठ येथील नवमहाराष्ट्र गणेशोत्सव मंडळाकडून गेली 15 वर्षे अखंडितपणे सुरु आहे. 

    प्रथेप्रमाणे दरवर्षी देवदिवाळीदिवशी फलटणला श्रीराम रथोत्सव पार पडत असतो. यावेळी श्रीराम प्रभूंच्या मूर्तींची रथातून नगरप्रदक्षिणा होत असते. या नगरप्रदक्षिणेदरम्यान सायंकाळनंतर रथ श्रीराम मंदीरात पोहचेपर्यंत रथासमोर हॅलोजनद्वारे विद्युत प्रकाशाची सुविधा नवमहाराष्ट्र गणेशोत्सव मंडळाकडून दरवर्षी केली जाते. या रोषणाईच्या सुविधेमुळे श्रीराम प्रभूंचा रथ उजळून तर दिसतोच शिवाय भाविकांनाही दर्शन घेणे सोयीचे होते. नुकत्याच पार पडलेल्या श्रीराम रथोत्सवादरम्यान मंडळाच्या या सेवेला 15 वर्षे पूर्ण झाली. 

    ‘‘नवमहाराष्ट्र गणेशोत्सव मंडळाकडून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्यापैकी एक श्रीराम रथोत्सवादरम्यानचा हा सामाजिक उपक्रम  प्रभू श्रीरामांची व भाविकांची सेवा करण्याच्या उद्देशाने प्रतिवर्षी पार पाडला जातो. शहरातून रथ जात असताना खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणकडून संबंधित भागातील वीज पुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे सायंकाळच्या वेळेला रथाचे दर्शन घेताना भाविकांची गैरसोय होऊ नये तसेच छेडछाड, चोरी सारखे अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी हा उपक्रम प्रामुख्याने राबवला जातो.’’, असे मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी यावेळी सांगितले.

    या उपक्रमादरम्यान नवमहाराष्ट्र गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विक्रम तेली, ओंकार परदेशी, शिवाजी कुंभार, पंकज परदेशी, मनोज कुचेकर, उपाध्यक्ष- सागर तेली, युवराज तेली, तोफिक शेख, विशाल तेली, अनिल तेली, हर्ष तेली, ओम तेली, आयुष तेली, वरद तेली, रित्विक तेली, जयेश दिलीप तेली, अथर्व विनोद तेली, अभिजीत नाळे, रवींद्र शिंदे, रुद्राक्ष तेली, नकुल तेली, केतन तेली, श्रेयश परदेशी , अनिश पुणेकर,  समर्थ तेली, करण रमेश तेली, प्रथमेश तेली,  श्रेयस तेली, रोहन तेली  मंडळाचे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments