भुजबळांना मंत्रीमंडळात स्थान न दिल्याने आमच्या सामाजिक भावना दुखावल्या : बापूराव शिंदे
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.18 - मा. छगन भुजबळ साहेब यांनी आदेश दिला म्हणून आम्ही महायुती सरकारच्या बाजूने उभे राहिलो या ठिकाणच्या स्थानिक उमेदवाराला मतदान करण्यासाठी लोकांना प्रवृत्त केले, असेच सगळ्या महाराष्ट्रात समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी महायुतीसाठी काम केले, मात्र मोठ्या संख्येने सरकार स्थापन झाल्यावर ओबीसी नेत्यांना अपमानास्पद वागणूक देऊन, सत्तेपासून व मंत्रिमंडळात स्थान न देऊन, आमच्या सामाजिक भावना दुखावल्या आहेत, त्यामुळे आम्ही या सरकारचा तीव्र निषेध व्यक्त करतो. आगामी निवडणुकीत या सरकारला त्यांची जागा दाखवून देऊ असा निषेध फलटण तालुका समता परिषदेचे अध्यक्ष बापूराव शिंदे यांनी फलटण संत सावतामाळी मंदिर येथे आयोजित निषेध सभेत व्यक्त केला.
नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये ओबीसी नेते माजी मंत्री छगन भुजबळ , आमदार गोपीचंद पडळकर ,लक्ष्मण हाके यांना स्थान न दिल्याने फलटण तालुका ओबीसी संघर्ष समिती , फलटण तालुका समता परिषद तसेच ओबीसी मुस्लिम संघटनेच्या वतीने महायुती सरकारचा संत सावतामाळी मंदिर येथे आत्मक्लेश आंदोलन करून जाहीर निषेध करण्यात यावेळी सर्वांनी काळ्या फिती बांधून महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून ओबीसी संघटनांनी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
या सभेत फलटण तालुका समता परिषदेचे अध्यक्ष बापूराव शिंदे , ओबीसी नेते गोविंद भुजबळ , पिंटूशेठ इवरे , आमिरभाई शेख , गिरीष बनकर , निवृत्ती खताळ , अमोल रासकर ,संदीप नेवसे यांनी अतिशय तीव्र शब्दात महायुती सरकारचा निषेध केला यावेळी मुनिषशेठ जाधव , दत्ता नाळे ,विजय शिंदे ,अरविंद राऊत , रणजित भुजबळ , वैभव नाळे , विवेक शिंदे , माधव जमदाडे विकास नाळे ,किरण राऊत मयूर शिंदे , दीपक शिंदे हृषीकेश शिंदे सनी रायकर रोहन शिंदे यांच्या सह ओबीसी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
No comments