Breaking News

फरांदवाडी येथे झालेल्या अपघातात एक ठार

One killed in an accident at Farandwadi

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१६ - मिरगाव ता. फलटण येथून फलटण कडे येत असताना फरांदवाडी हद्दीत, दुचाकी स्वारास कोणत्यातरी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी स्वार ठार झाला.

    फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेला माहितीनुसार,भिमराव दिनकर मदने, वय- 53 वर्षे, रा. कुरवली बुद्रुक (बरड), ता. फलटण हे दिनांक 15/12/2024 रोजी सायंकाळी मिरगाव येथील सांजोबा देवाचे यात्रेवरुन जेवण करुन, त्यांचे घरी मोटारसायकल वरुन येत असताना, फरांदवाडी गावचे हद्दीतील सातारा ते फलटण रोडवर बुवा ढाब्याच्या १० मीटर पुढे, कोणत्या तरी अज्ञात वाहनाने, भिमराव दिनकर मदने यांच्या वाहन क्रमांक एम एच १४ बी एच २११० या मोटारसायकलला धडक दिल्याने, झालेल्या अपघातात दुचाकी गाडीचे नुकसान करुन तसेच अपघात करणारा अज्ञात वाहन चालकाने अपघाताची पोलीसात खबर न देता, जखमी यास हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल न करता, तेथुन तो निघुन गेल्याने झालेया अपघातात मदने यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रक्तस्राव होवुन ते सदर अपघातात मयत झाले असल्याची फिर्याद शंकर निवृत्ती मदने, वय 38वर्षे, व्यवसाय- मजुरी, रा.कुरवली बुद्रुक(बरड), ता.फलटण यांनी दिली आहे अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन नम हे करीत आहेत.

No comments