बारामती शहराच्या धर्तीवर फलटणचा विकास होणार - आ.सचिन पाटील ; आमदार सचिन पाटलांची बारामती विकास कामांना भेट
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२८ - फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांनी बारामती शहरातील विविध विकासकामांची पाहणी केली. या पाहणीदरम्यान, त्यांनी बारामती शहरातील नाट्यगृह, पादचारी मार्ग, पाणी साठवण तलाव विकास परिसर व नागरिकांच्या दृष्टीने मूलभूत सुखसुविधांची पाहणी केली. या पाहणीनंतर, आमदार सचिन पाटील यांनी फलटणच्या नागरिकांना आश्वासन दिले की, “बारामती शहराच्या धर्तीवर आम्ही फलटणचा विकास करण्यासाठी सर्व प्रयत्न करणार आहोत. यामुळे फलटण शहराचे सुशोभन होणार आहे आणि नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील.”
विधानसभेच्या निवडणुकीत फलटणकर जनतेला फलटणचा विकास बारामती सारखा करण्याचा शब्द दिला होता. निवडणुकीनंतर आमदार सचिन पाटील ॲक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यादृष्टीने त्यांनी बारामती शहरातील विविध विकासकामांची पाहणी करून फलटण शहर विकासाच्या दृष्टीने पावले टाकण्यासाठी व शहराची तशी रचना करण्यासाठी आमदार सचिन पाटील यांनी बारामती शहराची पाहणी केली. याप्रसंगी बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक सचिन अहिवळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या पाहणीदरम्यान, आमदार सचिन पाटील यांनी बारामती शहरातील विविध विकासकामांचे विस्तृत माहिती घेतली. बारामती शहरातील नाट्यगृह हे एक महत्त्वाचे आकर्षण आहे. येथील नाट्यगृहाची रचना, सुविधा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन याबाबतची माहिती आमदार पाटील यांनी घेतली. पादचारी मार्गांची सुविधा आणि सुरक्षितता याबाबतही त्यांनी विशेष लक्ष दिले. पाणी साठवण तलाव व पाणी टाकी विकास परिसर हे बारामती शहराच्या जलसंपत्तीचे एक महत्त्वाचे अंग आहे आणि या परिसराच्या व्यवस्थापनाचे तपशीलवार अवलोकन केले गेले.
आमदार सचिन पाटील यांनी या पाहणीनंतर बोलताना सांगितले की, “बारामती शहराच्या विकास मॉडेलचा अभ्यास करून आम्ही फलटण शहराचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. बारामती शहरातील नाट्यगृहे, पादचारी मार्ग, पाण्याची टाकी विकास परिसर यांसारख्या सुविधां उभारून आम्ही फलटणचे सुशोभन करणार आहोत."
या पाहणीदरम्यान, बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनीही आपले अनुभव सांगितले. त्यांनी सांगितले की, “बारामती शहराच्या विकासात आमच्या नगरपरिषदेचा महत्त्वाचा वाटा आहे. आम्ही आमच्या अनुभवांचा लाभ फलटण नगरपरिषदेला देण्यासाठी तयार आहोत."
फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनीही या पाहणीचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, “बारामती शहराच्या विकास मॉडेलचा अभ्यास करून आम्ही फलटण शहराच्या विकासासाठी नवीन योजना तयार करणार आहोत. यामुळे फलटणच्या नागरिकांना शहराच्या विकास मॉडेलचा अभ्यास करून आम्ही फलटण शहराच्या विकासासाठी नवीन योजना तयार करणार आहोत. यामुळे फलटणच्या नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील.”
No comments