प्रभाकर भोसले यांची फेडरेशन ऑफिसर पदी तर शांताराम आवटे यांची युनिट डायरेक्टर पदी निवड
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१६ - जायंट्स ग्रुप फलटणचे सेक्रेटरी प्रभाकर भोसले सर यांची जायंट्स वेल्फेअर फाउंडेशन, २क येथे फेडरेशन ऑफिसर म्हणून नेमणूक झाली तर जायंट्स ग्रुपचे माजी अध्यक्ष शांताराम आवटे सर यांची युनिट डायरेक्टर म्हणून निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
जायंट्स वेल्फेअर फाउंडेशन या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या, भारतात व विदेशातील अनेक राज्यात असंख्य शाखा कार्यरत आहेत. जायंट्स ग्रुप या सेवाभावी संस्थेची स्थापना सप्टेंबर १९७२ साली मुंबई येथे, त्यावेळचे मुंबईचे शेरीफ पद्मश्री नाना चुडासामी यांनी स्थापन केली. आज या संस्थेच्या चेअरमन पदी सन्माननीय शायना एन.सी. या कार्यरत आहेत. जायंट्स वेल्फेअर फाउंडेशन मधील अनेक विभागापैकी कोल्हापूर ते बारामती हा विभाग असून, तो जायंट्स वेल्फेअर फाउंडेशन, फेडरेशन २क या नावाने ओळखला जातो. या विभागात एकूण १४ युनिट असून यात ७८ ग्रुप सामाजिक कार्य करत आहेत. या सर्व युनिटचे कार्य व्यवस्थित चालवण्यासाठी फेडरेशन २क स्थापना होऊन,यात वरिष्ठ ऑफिसरांच्या नेमणुका होत असतात की जे ऑफिसर या युनिटला वेळोवेळी मार्गदर्शन करीत राहतात.
२०२५ सालासाठी जायंट्स वेल्फेअर फाउंडेशन, फेडरेशन २क साठी विभागवार फेडरेशन ऑफिसर म्हणून नेमणुका झाल्या आहेत.
फलटण युनिट मधून सध्याचे जॉइंट्स ग्रुप फलटणचे अनेक वर्ष सेक्रेटरी पदावर काम करणारे प्रभाकर व्ही भोसले सर यांची फेडरेशन ऑफिसर म्हणून नेमणूक झाली आहे. तसेच जायंट्स ग्रुपला पडत्या काळात जिवंत ठेवण्यासाठी सतत धडपडणारे, गेली अनेक वर्ष अध्यक्ष पदावर काम करणारे, माजी अध्यक्ष, माजी फेडरेशन ऑफिसर शांताराम आवटे सर यांची फेडरेशन २क साठी युनिट डायरेक्टर म्हणून नेमणूक झाली आहे.
या निवडीबद्दल त्यांना जायंट्स ग्रुप फलटणचे सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण ग्रुप व सहेली ग्रुपला सतत मार्गदर्शन करणारे मोहनराव नाईक निंबाळकर, अरविंद निकम सर, दिलीपसिंह भोसले, माजी फेडरेशन ऑफिसर शिरीष शहा, जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष दीपकशेठ दोषी, फेडरेशन २क चे माजी अध्यक्ष गिरीश चितळे, रामदास रेवणकर, डॉ. प्रशांत माळी, प्रमोद शहा, डॉ.अनिल माळी, सौ. योजना देवळे यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
तसेच जायंट्स ग्रुप फलटण व सहेली ग्रुपच्या सर्व सभासदांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.
No comments