आसू येथे कडकडीत बंद ; अमित शहांच्या वक्तव्यासह परभणी घटना, बीड सरपंच हत्येचा केला निषेध
आसू (गंधवार्ता वृत्तसेवा) - सिद्धार्थ तरुण मंडळ व दलित पँथर यांच्यावतीने आसू येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अमित शहा यांच्या निषेध व परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाल्याने व बीड मधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आसू येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.
प्रारंभी मोर्चेकऱ्यांनी आसू येथील बौद्ध विहार येथून गावातून रॅली काढली. जोरदार घोषणाबाजी करत प्रमुख मार्गावरून ही रॅली काढण्यात आली. यावेळी सिद्धार्थ तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रॅलीच्या वेळी बरड पोलीस स्टेशन च्या वतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला.यावेळी बरड पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव जायपत्रे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.आसूचे पोलीस पाटील अशोक गोडसे पाटील,यांनी ही सहकार्य केले. बाजारपेठेतही कडकडीत बंद पाळण्यात आला होता.
No comments