Breaking News

परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीकरीता विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

Students are invited to apply for scholarships for higher education abroad

    सातारा दि. 26:  शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये राज्यातील अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांकडून परदेशात पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यासाठी शासनाच्या अल्पसंख्यांक विभागाने मंजूरी दिलेली आहे.  याची राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर ताज्या घडामोडीमध्ये विस्तृत जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे.  या योजनेसाठी अल्पसंख्यांक समुदायातील पात्र विद्यार्थ्यांनी परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळणेसाठीचा अर्ज आयुक्त, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, चर्च रोड पुणे यांचे कार्यालयास सादर करावयाचे आहेत.  अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर पर्यंत असून समक्ष किंवा पोस्टाने अर्ज सादर  करावयाचा आहे, अशी माहिती सातारा समाजकल्याणचे सहायक आयुक्त सूनिल जाधव यांनी केले आहे.

No comments