आपली फलटण मॅरॅथॉन स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख २० डिसेंबर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. 12 - आपली फलटण मॅरॅथॉन ही रविवार दिनांक ५ जानेवारी २०२५ या दिवशी सकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम नोंदणी दि. २० डिसेंबर २०२४ आहे, तरी आपली फलटण मॅरॅथॉन २०२४-२५ मध्ये आपला सहभागी व्हा आणि तुमच्या आयुष्याचा निरोगी आणि आनंदी प्रवास सुरू करा असे आवाहन डॉ. प्रसाद जोशी यांनी केले.
जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त दर वर्षी आपण आपली फलटण मॅरॅथॉन चे आयोजन करत असतो. या वर्षी ७ वे वर्ष आहे . दर वर्षी लोकांचा उत्साह वाढतच आहे.
लोकांना व्यायामाची सवय लागावी , सगळ्यांचे आरोग्य उत्तम राहावे या शुद्ध हेतूनेच आपण ही मॅरॅथॉन सुरू केली आहे. यावर्षी श्रोत्यांना संबोधित करण्यासाठी आणि विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यासाठी सन्माननीय अतिथी म्हणून अभिनेता, दिग्दर्शक, चित्रपट निर्माता, बिग बॉस फेम महेश मांजरेकर हे उपस्थित राहणार आहेत, तसेच दि. ५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ६ वाजता सजाई गार्डन येथून सुरू होणाऱ्या "आपली फलटण मॅरॅथॉन २०२४-२५ " चा फ्लॅग ऑफ महेश मांजरेकर व इतर मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याची माहिती डॉ. प्रसाद जोशी यांनी दिली.
आपली फलटण मॅरॅथॉन स्पर्धा ५ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता, सफाई गार्डन फलटण येथून सुरू होणारी ही मॅरेथॉन स्पर्धा विविध वयोगटांमध्ये घेतली जाणार असून, www.joshihospitalpvtltd.com
या वेबसाईट वर इच्छुकांना रजिस्ट्रेशन करता येणार आहे. आपली - फलटण मॅरॅथॉन २२०५ स्पर्धा खालील वयोगटानुसार होईल. १. १८ ते ३० (पुरुष व महिला) जोश पूर्ण युवा गट २. ३१ ते ४५ (पुरुष व महिला) सळसळती तरुणाई ३. ४६ ते ६४ (पुरुष व महिला) प्रगल्भ प्रौढ ४. ६४ च्या वर (पुरुष व महिला) अनुभवी ज्येष्ठ. असे ४ वयोगट करण्यात आले आहेत. पहिले तीन वयोगट हे ५ किमी , १०किमी आणि १५ किमी मध्येइच्छुक आपल्या क्षमतेनुसार सहभागी होऊ शकतात. चौथा गट हा फक्त किमी वोकेथॉन साठीच आहे .या गटाला रजिस्ट्रेशन माफ आहे.
पहिल्या तीन गटांना पुरुष व महिला यांना प्रत्येकी पहिल्या येणाऱ्या तीन जणांना मान्यवरांच्या हस्ते सर्टिफिकेट व बक्षीस दिले जाणार आहे, स्पर्धा पूर्ण करणाऱ्या खेळाडूला सर्टिफिकेट आकर्षक मेडल मिळेल तर सहभागी प्रत्येक खेळाडूला गुडी बॅग, नाश्ता, ड्रिंक्स मिळणार आहे.
No comments