एड्स रोगाविषयी झालेली जनजागृती व मोफत औषधोपचार यामुळे एड्सच्या रुग्णांची संख्या घटली - डॉ. चंद्रशेखर जगताप
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.14 - महाराष्ट्र शासनाने १९९२ साली एड्स च्या रुग्णास मोफत औषध पुरवठा करणे हा निर्णय घेतला त्याचप्रमाणे १९९२ च्या निर्णयामुळे मोफत औषध उपचार पुरवून माणसाचे जीवनमान उंचावण्याचे काम शासनाने केले आहे अशाप्रकारे एड्स रोगाविषयी झालेली जनजागृती व आयुष्यभर मोफत औषधोपचार यामुळे एड्स च्या रुग्णांची संख्या कमी झाली असे प्रतिपादन फलटण उपजिल्हा रुग्णालयाचे वरिष्ठ मेडिकल ऑफिसर डॉ. चंद्रशेखर जगताप यांनी केले.
मुधोजी महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना तसेच रेड रिबन क्लब यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक एड्स दिन जनजागृती या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. चंद्रशेखर जगताप बोलत होते. मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एच.कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रभाकर पवार सर होते. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. अशोक शिंदे,रेड रिबन क्लबचे चेअरमन प्रा. अक्षय अहिवळे, प्रा. किरण सोनवलकर प्रा. डॉ. अभिजीत धुलगुडे यांची उपस्थिती होती.
आपल्या मनोगतामध्ये डॉ. चंद्रशेखर जगताप पुढे म्हणाले की, ए.आर. टी प्रणालीच्या औषधांमुळे व्यक्तीच्या रक्तामधील पांढऱ्या पेशींची ताकद वाढवली जाते प्रथम ताकद कमी असल्याने गुप्तरोग, बारीक ताप, रक्त कमी होणे असे विकार जडतात. प्रत्येक महिन्याला एड्स च्या रुग्णास औषधोपचारासाठी सहा ते सात हजार रुपये खर्च येत होता. परंतु ,शासनाच्या नियमानुसार रुग्णास ही औषधे मोफत दिली जातात. यामुळे माणसाचे जीवनमान उंचावले आहे याप्रसंगी आय.सी.टी.सी समुपदेशक सौ. विशाखा पलूसकर यांनी एड्स हा रोग असुरक्षित रक्तपुरवठा,असुरक्षित लैंगिक संबंध गरोदर अवस्थेत आईला झालेला हा एड्स विकार, लग्नानंतर पहिल्या बाळंतपणाच्यावेळी अज्ञानामुळे न केलेले वैद्यकीय तपासणी यामुळे होतो.त्याचप्रमाणे मोबाईल फोन, चाट जीपीटी इतर साधनांमुळे तरुणांच्या भावना चालवल्या जातात तरी तुम्ही असले पाप करू नका.लग्नामध्ये कुंडली न पाहता एड्स ची तपासणी करून घ्या. असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. प्रभाकर पवार म्हणाले की, सन १९८८ ते १९९४ अखेर हा भयानक रोग दारापर्यंत कधी पोहोचला ते कळले देखील नाही ड्रायव्हरच्या गावावर बहिष्कार टाकण्यात आले.या संकटात भारताने मोठे काम केले.डॉक्टरांचे योगदान मोठे होते.एड्स निर्मूलनाच्या चळवळीमुळे भीती कमी झाली. माणसाने मदत घेताना काळजी घ्यावी.जगाबरोबर आपण जगलं पाहिजे.
सदर कार्यक्रमास मुधोजी ज्युनियर कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक एम.एस. शिंदे सर उपस्थित होते त्याचबरोबर प्रा.सौ. नीलम देशमुख,प्रा.भोसले प्रा.सौ.शिंदे व राष्ट्रीय सेवा योजनेचे कनिष्ठ व वरीष्ठ विभागाचे असंख्य विद्यार्थी यांची उपस्थिती होती.कार्यक्रम कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अशोक शिंदे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा.डॉ.अभिजीत धुलगुडे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार रेड रिबीन क्लबचे चेअरमन प्रा.अक्षय अहिवळे यांनी केले.
No comments