गारपीरवाडी येथून जेसीबीच्या हायड्रोलिक पंपाची चोरी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१९ - गारपीरवाडी तालुका फलटण येथील पाईप फॅक्टरीच्या कंपाउंड मधून, जेसीबीचा हायड्रोलिक पंप चोरून नेला असून, ११० लिटर ऑइल सांडून नुकसान केल्याप्रकरणी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार,दि. २७/११/२०२४ रोजी सकाळी ९ वाजता ते दि. १५/१२/२०२४ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान, गारपीरवाडी, फलटण येथील पाईप फॅक्टरी च्या कंपाउंड मधून कोणीतरी अज्ञात चोरट्याने संमतीशिवाय जेसीबी क्र.ए आर २० ए ०८९७ या जेसीबीचा हायड्रोलिक पंप चोरुन नेला आहे व ११० लिटर ऑइल सांडुन नुकसान केले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार सचिन फाळके हे करीत आहेत.
No comments