शिवछत्रपती पुतळ्याचा सातारा ते जपान प्रवास ; १५ जानेवारी रोजी भव्य मिरवणूक
सातारा दिनांक 11 प्रतिनिधी - मराठा बिजनेस फोरम सातारा व आम्ही पुणेकर या दोन संस्थांच्या सहकार्याने देशातील बारा राज्यांमधून भव्य अश्वारूढ शिव पुतळ्याची मिरवणूक काढली जाणार असून त्या मिरवणुकीचा प्रारंभ दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी चार वाजता राजवाडा गांधी मैदान (सातारा ) येथून होणार आहे .या पुतळ्याचे अनावरण ८ मार्च रोजी जपानची राजधानी टोकियो येथे तेथील राजघराण्याच्या उपस्थित केले जाणार आहे अशी माहिती मराठा बिजनेस फोरमचे अध्यक्ष व विकसक श्रीधर कंग्राळकर यांनी दिली.
या शिवरथयात्रेला खासदार उदयनराजे भोसले, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले , पर्यटन मंत्री शंभूराज देसाई , मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे , कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व खासदार नितीन जाधव यांची उपस्थिती असणार आहे .हा पुतळा तीन मीटर लांब व तीन मीटर उंच अश्वारूढ असून या पुतळ्याचे वजन अडीचशे किलोग्रॅम आहे .या पुतळ्याचे अनावरण 8 मार्च रोजी टोकियो येथे केले जाणार असून या कामासाठी आम्ही पुणेकर संस्थेने पुढाकार घेतला आहे मूळ भारतीय वंशाचे जपानचे आमदार योगेंद्र पुराणिक यांचा यामध्ये मोठा वाटा आहे.
साताऱ्यातील मराठा बिजनेस फोरम व साताऱ्यातील विविध शिवभक्त संघटनांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून तब्बल दोन महिने चालणाऱ्या या रथयात्रेचा शुभारंभ साताऱ्यातून होत आहे मराठा बिजनेस बंद फोरम आम्ही पुणेकर एडोगावा इंडियन कल्चर सेंटर ऑल जपान असोसिएशन ऑफ इंडियन्स यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे . ही रथयात्रा राजवाडा मोती चौक शेटे चौक व तेथून पोलीस मुख्यालय मार्गे पोवई नाका येथे जाणार आहे छत्रपती शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा एक दिवसासाठी साताऱ्यात जलमंदिर येथे मुक्कामी राहणार आहे .संयोजक त्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत
ही रथयात्रा सातारा , पुणे ,मुंबई , सुरत, बडोदा , अहमदाबाद , उदयपूर , जयपूर,दिल्ली, कुरुक्षेत्र,आग्रा, लखनऊ ,ग्वाल्हेर, भोपाळ , नागपूर, हैदराबाद, बेंगलोर, बेळगाव ,पणजी ,कोल्हापूर ,तेथून पुन्हा पुणे येथे समाप्त होणार आहे त्यानंतर विमान प्रवासाने हा पुतळा जपानची राजधानी टोकियो येथे नेला जाणार आहे व तेथील अकि हितो राजघराण्याच्या उपस्थितीत या पुतळ्या चा भव्य अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या संपूर्ण शिवस्वराज्य यात्रेची माहिती श्रीधर कंग्राळकर जगदीश शिर्के मनोज देशमुख किरण पाटील अमित बोडके , चंद्रसेन जाधव यांच्या उपस्थितीत देण्यात आली.
No comments