Breaking News

मुधोजी महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागामार्फत "अभिरुप निवडणूक प्रक्रिया" संपन्न

Abhirup Election Process" conducted by Department of Political Science in Mudhoji College

         फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२४ -  फलटण एज्युकेशन सोसायटीचे,  मुधोजी महाविद्यालय,  फलटण येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, राज्यशास्त्र विभाग आणि निवडणूक साक्षरता क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने "अभिरुप निवडणूक प्रक्रिया" ही Experiential Activity 23 जानेवारी 2025 रोजी पार पडली. या प्रक्रियेसाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तीन पक्ष स्थापन केले होते. बी. ए. भाग एक चा पक्ष "दे धक्का", बी. ए. भाग दोन चा पक्ष "आम्ही सगळे एकत्र" आणि बी. ए. भाग तीन चा पक्ष "जगा आणि जगू द्या" अशी स्थापन केलेली होती.  या पक्षाचे उमेदवार अनुक्रमे सिद्धांत निकाळजे, श्रुती जगताप आणि मयूर बनकर हे होते.

    विद्यार्थ्यांंना अभ्यासक्रमाच्या दृष्टीने लोकशाहीचे महत्व कळावे आणि जास्तीत जास्त मतदानाचा टक्का वाढला पाहिजे या उद्देशाने ही अभिरुप निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली.  या प्रक्रियेत एकूण 548 मतदात्यानी आपला मतदानाचा हक्क बजावला.  या एकूण मतदानापैकी 447 मतदान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना केले (358 विद्यार्थिनी व 135 विद्यार्थी) तर 101 मतदान प्राध्यापक, प्रशासकीय वर्ग आणि कर्मचारी केले. सिद्धांत निकाळजे याला 268, श्रुती जगताप याला 79 तर मयूर बनकर याला 181 मते मिळाली आणि 20 मते बाद झाली अश्या प्रकारे सिद्धांत निकाळजे 87 मताच्या फरकाने विजयी झाला.

    मतदान केंद्रावर विद्यार्थ्यांनी अधिकारी व कर्मचारी ची कामे पार पाडली, त्यामध्ये केंद्राध्यक्ष जय जाधव (बी. ए. भाग एक), मतदान अधिकारी एक सोहम धुमाळ, मतदान अधिकारी दोन निकिता गायकवाड, मतदान अधिकारी तीन साक्षी कदम, पोलीस शिपाई नम्रता लोखंडे आणि प्रिया बोराटे (बी. ए. भाग एक) तर शिपाई करण राऊत अशी पदे विद्यार्थ्यांनी भूषविलेले होते. या निवडणुक प्रक्रियेस शाळा क्रमांक 8, फलटण नगर परिषद, फलटण च्या 5 वी च्या विद्यार्थिनी श्री.  अमोल खंकाळ सर यांच्या समवेत भेट दिली. या अभिरुप निवडणूक प्रक्रियेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच.  कदम (सर) यांचे मार्गदर्शन लाभले, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.  टी. पी. शिंदे सर यांच्या संकल्पनेतून तसेच राज्यशास्त्र विभागातील  प्रा. गिरीष पवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडली, तसेच राज्यशास्त्र विभागातील प्रा. अक्षय अहिवळे आणि प्रा. प्रियांका शिंदे यांनी मोलाची साथ दिली, अशा प्रकारे अभिरुप निवडणूक प्रक्रिया मुधोजी महाविद्यालयात यशस्वीपणे पार पडली.

No comments