भरतशेठ बेडके यांचा राष्ट्रवादीत प्रवेश ; फलटण तालुक्यात राष्ट्रवादी वाढवण्यासाठी प्रयत्न करणार - आ.सचिन पाटील
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१६ - फलटण नगर नपरिषेचे माजी नगरसेवक व फलटण शहरातील नामांकित व्यक्तीमत्व भरतशेठ बेडके व युवा नेते अजिंक्य बेडके यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटात आमदार सचिन पाटील व युवा नेते शिवरूपराजे खर्डेकर यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
आमदार सचिन पाटील यांनी यावेळी सांगितले की, फलटण तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जनतेची कामे महायुतीचे सरकार म्हणून आम्ही करणार आहे.
यावेळी शिवरूपराजे खर्डेकर यांनी बेडके परिवाराचे स्वागत केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
No comments