Breaking News

लूटमार करणाऱ्या आरोपीस फलटण ग्रामीण पोलिसांनी केले अटक

Phaltan rural police arrested the accused of looting

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१ - दिनांक ७ डिसेंबर रोजी दोन महाविद्यालयीन तरुण तरुणी सकाळी वाढदिवस असल्याने कुरवली येथील तलावाजवळ १२ वाजण्याच्या दरम्यान गेले होते. वाढदिवस असल्याने, त्यांच्या अंगावर सोन्याच्या चैनी व  दोन स्मार्टफोन होते. त्या ठिकाणी इतर कोणीही नसल्याचा फायदा घेऊन, दोन अज्ञात इसमांनी त्यांना दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान मारहाण करून, त्यांच्या गळ्यातील दोन चैन व दोन्ही स्मार्टफोन असे जवळजवळ ३ लाख रुपयाचा ऐवज काढून घेतला. त्याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये त्याच दिवशी गुन्हा क्रमांक 112 / 2024 कलम 309,111 भारतीय न्याय संहिताप्रमाणे दोन अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा नोंद होता.

    सदर घटना गंभीर असल्याने या ठिकाणी पोलिसांनी गोपनीय माहिती काढण्यास सुरुवात केली व पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपी कार्तिक महेश चव्हाण वय २५ वर्ष राहणार कुरवली खुर्द यास अटक केली असून त्याच्याकडून मुलीकडील चोरीस गेलेला स्मार्टफोन किंमत अंदाजे २५ हजार रुपये जप्त करण्यात आलेला असून, त्याचा साथीदार स्वप्निल महेश जाधव राहणार कुरवली हा अद्यापही फरारी आहे. सदर आरोपी यांचा अभिलेख तपासला असता, त्यांच्यावर यापूर्वीसुद्धा या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपींवर संघटित गुन्हेगारी कलमांची सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे.

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.वैशाली कडूकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे व सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक पोलीस उपनिरीक्षक पवार, पोलीस हवालदार कदम, चतुरे, पोलीस नाईक जगदाळे, दडस हे करत आहेत.

No comments