श्रीमती शांताबाई गणपतराव धुमाळ तथा काकी यांचे वृद्धापकाळाने निधन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.12 - आदर्की बुद्रुक ता. फलटण गावचे माजी सरपंच विलासराव गणपतराव धुमाळ यांच्या मातोश्री श्रीमती शांताबाई गणपतराव धुमाळ तथा काकी यांचे काळूबाईनगर, मलठण, फलटण येथील राहत्या घरी अल्पशा आजाराने आज शुक्रवार दि. १० जानेवारी रोजी निधन झाले.
दै. ऐक्य, फलटण कार्यालय प्रमुख, ज्येष्ठ पत्रकार विनायक शिंदे यांच्या त्या आजी होत. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर माजी आमदार दिपकराव चव्हाण सुभाषराव धुमाळ बाळासाहेब कासार (मोहोळकर) विलासराव नलवडे बाळासाहेब नलवडे वाई पंचायत समिती माजी सभापती भोसले यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी काळूबाईनगर, मलठण, फलटण येथील राहत्या घरी अंत्यदर्शन घेऊन धुमाळ कुटुंबीयांचे सांत्वन केले.
त्यानंतर शुक्रवारी सकाळी ११ वाजता राहत्या घरापासून निघालेल्या अंत्ययात्रेत विविध क्षेत्रातील मान्यवरांसह, आप्तेष्ट, मित्रमंडळी, फलटण व आदर्की बु|| पंचक्रोशीतील ग्रामस्थ सहभागी झाले होते. वैकुंठ स्मशानभूमी, फलटण येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
No comments