Breaking News

फलटण ते प्रयागराज महाकुंभमेळा ; संजय जामदार यांचा सायकल प्रवास

Phaltan to Prayagraj Mahakumbh Mela; Cycle journey of Sanjay Jamdar

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२२ - प्रयागराज महाकुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी कोळकी ता. फलटण येथील पत्रकार संजय जामदार हे फलटण येथून सायकलवर प्रयागराजकडे रवाना झाले आहेत.

    सध्या ते जबलबुर मध्यप्रदेश येथे पोहचले असून, दि. २६ जानेवारी पर्यंत प्रयागराज येथे पोचण्याचा त्यांचा मानस आहे.

    कोळकी ता. फलटण मधील मालोजीनगर येथील हनुमान मंदिर येथून संजय जामदार यांनी आपल्या सायकल यात्रेचा शुभारंभ केला. फलटणहून पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, लातूर, नांदेड, माहूरगड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, जबलपूर, कटणी, रिवा ते प्रयागराज कुंभमेळा असा ते सायकल प्रवास करणार आहेत. तर परतीचा सायकल प्रवास ते प्रयागराज, काशी, गोरखपूर मठ (श्री योगी आदित्य नाथ), अयोध्या, चित्रकुट, झाशी, शिवपूरी, उज्जैन (श्री महांकालेश्वर), इंदौर, माहेश्वर (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची राजधानी), मंडलेश्वर, ओंकारेश्वर, कारंजा लाड (श्री नरसिंह सरस्वती स्वामींचे जन्मस्थान), मुक्ताईनगर (श्री मुक्ताबाईंचे स्थान), घृष्णेश्वर, अहिल्यादेवी नगर, दौंड, बारामती, फलटण, कोळकी असा करणार आहेत. याव्यतिरिक्त या मार्गावरील जवळपास असणाऱ्या अन्य धार्मिक स्थळांनाही ते भेटी देणार आहेत.

    कुंभमेळ्यानंतर ते काशी, अयोध्या व अन्य धार्मिक स्थळांनाही भेटी देणार आहेत. या धार्मिक यात्रेच्या निमित्ताने जामदार हे सुमारे साडे तीन हजार किलोमीटरचा प्रवास सायकलद्वारे करणार आहेत.

No comments