Breaking News

आ. सचिन पाटील व मा. खा. रणजितसिंह यांचा दि १० फेब्रुवारी रोजी जनता दरबार

come Sachin Patil and Mr. kha Janata Durbar of Ranjit Singh on 10 February

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि ३१ - फलटण कोरेगाव चे विद्यमान आमदार सचिन पाटील व मा खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षेते खाली दि १० फेब्रुवारी दु २ वाजता वाठार स्टेशन येथील राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे फलटण कोरेगांव विधानसभा मतदार संघातील कोरेगांव तालुक्यातील २६ गावातील कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावातील शासकीय विभागात प्रलंबित असणाऱ्या जनतेच्या कामाचे तथा तक्रारीचे अर्ज दिलेल्या नमुन्यात दोन प्रतीत घेऊन दि. ३ फेब्रुवारी २०२५ अखेर श्री. बाळासाहेब सोळसकर 9764403267, श्री. शहजीतात्या भोईटे 8888124343, श्री. अमितजी चव्हाण 8433688385, श्री. रामभाऊ लेंबे पिंपोडे 86864 31111, श्री. मनोज कलापट 9423032651, श्री. दत्तोभाऊ धुमाळ 9527991111, श्री. मंगेशजी धुमाळ 9822754091, श्री. अविनाश फडतरे 9970545255, श्री. विजयकाका 9975795229, श्री. राजेंद्र धुमाळ 9764225805, श्री. दीपक पिसाळ 79721 21583 यांच्याकडे जमा करायचे आहेत.

    सदर अर्ज त्या शासकीय विभागास सुपूर्द करण्यात येऊन, ते शासकीय विभाग जनता दरबाराचे दिवशी त्यावर लेखी कार्यवाही केलेली उत्तरे घेऊन येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या प्रलंबित प्रश्नांचे अर्ज ३ फेब्रुवारी अखेर दोन प्रतीत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जनता दरबारात ऐन वेळीचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. आपल्या समस्यांचे निराकरण होणे महत्वाचे, त्यालाच प्राधान्य द्यावे. अधिकाऱ्यांचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments