Breaking News

प्रिंट मिडीया विषयी विश्वासर्हता वाढली - प्रा.शांताराम आवटे, ध्येयवादी समाज निर्माण व्हावा यासाठी पत्रकार - वृत्तपत्रे कार्यरत - प्रा.रमेश आढाव

Credibility increased in print media - Prof. Shantaram Awte

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.८ -  आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त फलटण येथील महात्मा एज्युकेशन सोसायटीचे आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयात जांभेकर यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी शहरातील पत्रकार बांधव उपस्थित होते.

    प्रारंभी ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव आणि सा.रामआदेशचे संपादक बापूराव जगताप यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.तसेच पुस्तक,कला व रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी नमस्ते फलटण चे संपादक वैभव गावडे,पत्रकार सतीश कर्वे,संजय जामदार,महात्मा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष शांताराम आवटे,श्रीराम विद्याभवन शाळा समितीचे अध्यक्ष रविंद्र बर्गे,साहित्यिक प्रा.विक्रम आपटे,प्रा.मोनाली पाटील,मुख्याध्यापक भिवा जगताप, मनीष निंबाळकर उपस्थित होते.

    जांभेकर हे अतिशय कुशाग्र बुध्दीमत्तेचे होते.त्यांचे वाचन आणि पाठांतर अफाट होते.त्यांचा हा गुण विद्यार्थ्यांनी आत्मसात केला तर त्यांचीही बुध्दी कुशाग्र होण्यास मदत होईल. सध्या डिजिटल मिडीयात त्याच त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा प्रसारित होत असल्याने, समाज मनावर विपरीत परिणाम होत आहे. प्रिंट मिडीया विषयी विश्वासर्हता वाढली आहे. त्यामुळे सामान्य वाचक प्रिंट मिडीयाकडे अधिक वळला आहे.सत्तधारी ब्रिटीशांच्या विरोधात जांभेकर आणि टिळक यांनी आपल्या पत्रकारितेतून आवाज उठवला.तीच अपेक्षा आजच्या पत्रकारांकडून आहे असे शांताराम आवटे यांनी सांगितले.

    समाजामध्ये चांगले आदर्श निर्माण व्हावेत, ध्येयवादी समाज निर्माण व्हावा यासाठी पत्रकार आणि वृत्तपत्रे कार्यरत असतात.त्याची मुहूर्तमेढ आचार्य जांभेकर यांनी रोवली आहे.पत्रकारितेची विश्वासार्हता वाढविण्याकडे,ती अधिक जबाबदारीने पार पाडण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणे हाच खरा या पत्रकारिता दिनाचा संदेश आहे असे प्रा.रमेश आढाव यांनी सांगितले.

    प्रा.मोनाली पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.भिवा जगताप आणि मनीष निंबाळकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.अरुण खरात यांनी सूत्रसंचालन केले.भिवा जगताप यांनी आभार मानले.

No comments