ॲग्रीस्टॅक योजने अंतर्गत फलटण तालुक्यात पीक पाहणी सुरू
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१५ - ॲग्रीस्टॅक योजनेच्या अनुषंगाने फलटण तालुक्यात प्रांताधिकारी सचिन ढोले यांचा शेतकरी भेट व पीक पाहणी दौरा सुरू असून, आज जिंती तालुका फलटण परिसरातील शेतकऱ्यांच्या भेटी व पिकपाहणी करण्यात आली. तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल, सहाय्यक यांच्या मदतीने पीक पाहणी सुरू असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
सध्या रब्बी हंगाम नियमित पीक पाहणी सुरू असून, ॲग्रीस्टॅक प्रकल्पा अंतर्गत, फलटण तालुक्यात शेतकरी आणि त्यांची शेती अशी माहिती घेण्याचे काम चालू असल्याची माहिती फलटण तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी दिली.
ॲग्रीस्टॅक योजनेचा उद्देश हा सरकार राबवत असलेल्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे असा आहे. या योजनेची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे.
प्रत्येक शेतकऱ्याचा एक "युनिक फार्मर आयडी" तयार केलं जाणार आहे. "ॲग्रीस्टॅक" योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या यूनिक फार्मर आयडी आणि त्यांच्या लँड रेकॉर्डला जोडण्याची ( लिंक करण्याची ) मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजेतंर्गत शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी त्यांच्या शेतीचा संलग्न माहिती संच तयार केला जाणार आहे.
No comments