निंभोरे येथे शेतात मृत बिबट्या आढळला
A dead leopard was found in a field in Nimbhore.
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२६- निंभोरे ता.फलटण गावाच्या हद्दीत पुणे पंढरपूर पालखी महामार्गाजवळ असलेल्या गव्हाच्या शेतात बिबट्या मृतावस्थेत आढळून आला असून, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन, बिबट्याकचे शव घेऊन गेले. बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला याचा अधिक तपास ते करत आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, निंभोरे गावाच्या हद्दीत, पालखी महामार्गाजवळ गव्हाच्या शेतात, आज दिनांक २६ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास नागरिकांना बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला, त्यांनी ही बाब फलटण वनविभागाला कळवली वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन, मृत बिबट्याचे शव ताब्यात घेतले असून बिबट्याचा मृत्यू नक्की कशामुळे याचा तपास करीत आहेत. घटनास्थळी बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शिवविच्छेदनानंतर बिबट्याचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला याची अधिक माहिती होईल असे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
No comments