Breaking News

ड्रंक अँड ड्राईव्ह : शहर पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन ; चौघांवर गुन्हे दाखल

Drunk and Drive: City Police's Combing Operation; Four have been charged

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१ - फलटण शहरांमध्ये फलटण शहर पोलिसांनी दि.३० डिसेंबर रोजी स.पो. नि नितीन नम यांच्या नेतृत्वाखाली कोंबिंग ऑपरेशन राबवत दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये एकूण ४ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

    पोलीस स्टेशन कडून मिळाले माहितीनुसार दिनांक 30 डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास क्रांतीसिंह नाना पाटील चौक फलटण येथे, अनिल बहादुर राहणार खाऊ गल्ली फलटण हा त्याचे ताब्यातील स्कुटी मोटार सायकल क्र.एम एच १४ जी टी ७९३२ ही दुचाकी वेडीवाकडी चालवीत असताना मिळुन आलेने, त्याची ब्रेथ अँनालायझर इलेक्ट्रीक मशिनने तपासणी करून घेतली असता, त्याने दारुचे सेवन केल्याचे मशिनवर प्रमाण दर्शविले त्यामुळे त्याच्यावर म्हणून करण्यात आला.अधिक तपास स.पो.फौ.सुरेश शिंदे हे करीत आहेत.

    दिनांक ३०/१२/२०२४ रोजी रात्रौ ८.४३ वाजण्याच्या सुमारास, श्रीराम साखर कारखाना बायपास फलटण, ता. फलटण, जि. सातारा येथे रोडवर इसम नामे - गंगाराम क्षिरसागर, वय 34 वर्षे, रा. निरगुडी, ता.फलटण, हा त्याचे ताब्यातील मोटार सायकल क्र. एम एच ११ ए क्यू ५१७५ ही दुचाकी वेडीवाकडी चालवीत असताना मिळुन आलेने त्याची ब्रेथ अँनालायझर इलेक्ट्रीक मशिनने तपासणी करून घेतली असता त्याने दारुचे सेवन केल्याचे मशिनवर प्रमाण दर्शविले. अधिक तपास स.पो.फौ.सुरेश शिंदे हे करीत आहेत.

    दिनांक 30/12/2024 रोजी ८.९ वाजण्याच्या  सुमारास, श्रीराम साखर कारखाना बायपास फलटण, ता. फलटण, जि. सातारा येथे रोडवर, इसम नामे - अक्षय बनकर, रा. जाधववाडी, फलटण, हा त्याचे ताब्यातील मोटार सायकल क्र. एम एच ४२ ए टी ९३४ ही दुचाकी वेडीवाकडी चालवीत असताना मिळुन आलेने आम्ही त्याची ब्रेथ अँनालायझर इलेक्ट्रीक मशिनने तपासणी करून घेतली असता त्याने दारुचे सेवन केल्याचे मशिनवर प्रमाण दर्शविले.
अधिक तपास स.पो.फौ.सुरेश शिंदे हे करीत आहेत.

    दिनांक 30/12/2024 रोजी ११.४९ वाजण्याच्या सुमारास नाकाबंदी दरम्यान नानापाटील चौक, फलटण, ता. फलटण, जि. सातारा येथे रोडवर, इसम नामे - आकाश  हजारे, रा. बोंबाळे हजारेवस्ती, ता.खटाव,  हा त्याचे ताब्यातील मोटार सायकल क्र. एम एच १२ एस यु २९४२ ही दुचाकी वेडीवाकडी चालवीत असताना मिळुन आलेने आम्ही त्याची ब्रेथ अँनालायझर इलेक्ट्रीक मशिनने तपासणी करून घेतली असता दारुचे सेवन केल्याचे मशिनवर प्रमाण दर्शविले. अधिक तपास स.पो.फौ.सुरेश शिंदे हे करीत आहेत.

No comments