एलिमेंटरी चित्रकला परीक्षा 2024 यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज फलटणचा शंभर टक्के निकाल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१६ - श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण मधील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2024 मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी चित्रकला परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केले यामध्ये विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे यामध्ये A ग्रेडमध्ये 5 विद्यार्थी B ग्रेड मध्ये 10 विद्यार्थी सी ग्रेड मध्ये 14 विद्यार्थी याप्रमाणे ग्रेड मिळालेली आहे एकूण 29 विद्यार्थी या परीक्षेकरिता प्रविष्ट झाले होते. एलिमेंट्री चित्रकला परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षिका सौ रणवरे (ढेंबरे) मॅडम यांचे अभिनंदन श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती सविता काकी सुभाषराव सूर्यवंशी (बेडके)संस्थेचे मानद सचिव मा श्री डॉ.सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) नियामक मंडळाचे सदस्य मा श्री महेंद्र भैय्या सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) सदस्या ज्योतीताई सचिन सूर्यवंशी( बेडके) तसेच प्रशालेचे प्राचार्य मा श्री थोरात एस बी उपप्राचार्य श्री घनवट पी डी पर्यवेक्षक मा श्री खरात के एच यांनी अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
No comments