नाईकबोमवाडीचे माजी उपसरपंच माऊली कारंडे व तुकाराम खुसपे यांचा भाजपमध्ये प्रवेश
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२० - नाईकबोमवाडीचे माजी उपसरपंच माऊली कारंडे व गावातील जेष्ठ नागरिक तुकाराम खुसपे यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, गटनेते अशोकराव जाधव, माजी सरपंच निवृत्ती खुसपे , बापुराव चव्हाण, संदीप कदम, राजाभाऊ नागटिळे, अक्षय पिसाळ, दयानंद घाडगे, सुखदेव चव्हाण, उपस्थित होते.
माऊली कारंडे व तुकाराम खुसपे यांच्या प्रवेश मुळे नाईकबोमवाडी व परिसरामध्ये भाजपची ताकद वाढणार आहे.यामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला असून, नाईकबोमवाडी गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.
No comments