श्री दत्त इंडिया कारखान्याची सव्वा चार लाखांची फसवणूक ; ९ जणांवर गुन्हा दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१३ - श्री दत्त इंडिया प्रा. लि. साखरवाडी, ता. फलटण, जि. सातारा या कारखान्याची फसवणूक करून, ४ लाख २५ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी नऊ जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान याप्रकरणी दोन चीट बॉय यांनाही अटक करण्यात आली आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 04/12/2024 ते दि. 14/12/2024 रोजीच्या दरम्यान श्री दत्त इंडिया प्रा. लि., साखरवाडी, ता. फलटण, जि. सातारा या कारखान्याच्या आवारात 1. सचिन नबाजी कोकरे, रा. अंदोरी, ता. खंडाळा, जि. सातारा (वाहन मालक) 2. अनिता सचिन होळकर, रा. रुई, ता. खंडाळा, जि. सातारा (वाहन मालक) 3. राहूल म्हाळसाकांत कोकरे, रा. अंदोरी, ता. खंडाळा, जि. सातारा (वाहन मालक व शेतकरी) 4. जितेंद्र चंद्रकांत भिसे, रा. अंदोरी, ता. खंडाळा, जि. सातारा (वाहन चालक) 5. भाऊसो तात्याबा कोकरे, रा. अंदोरी, ता. खंडाळा, जि. सातारा (वाहन चालक) 6. पांडुरंग विणनाथ सुतार, रा. अंदोरी, ता. खंडाळा, जि. सातारा (वाहन चालक) 7. सुरज अशोक धायगुडे, रा. अंदोरी, ता. खंडाळा, जि. सातारा (वाहन चालक व शेतकरी) 8. ज्ञानेश्वर महादेव होळकर, रा. रुई, ता. खंडाळा, जि. सातारा (शेतकरी) 9. सचिन महादेव होळकर रा. रुई, ता. खंडाळा, जि. सातारा (वाहन मालक) यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता आपसात संगनमत करुन श्री दत्त इंडिया प्रा. लि. साखरवाडी, ता. फलटण, जि. सातारा या कारखान्याची दिशाभुल व फसवणुक करुन 102.167 मे. टन ऊस कारखान्याला न घालता, तो घातल्याच्या नोंदी करण्यास भाग पाडुन, ऊसाचे बिल आणि तोडणी वाहतुकीचे मिळुन एकुण 4,25,000/- रुपयांचा अपहार करण्याचा प्रयत्न केला आहे.
No comments