Breaking News

घडसोली मैदान सर्वांसाठी खुले केले जाईल ; आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण करणार - मा. खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर

Ghadsoli Maidan will be open to all; International standard sports ground will be made - Mr. Ranjit Singh Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.3 -  घडसोली मैदानातील  ६ एकर जमीन ही जिल्हाधिकारी तथा महाराष्ट्र शासनाच्या मालकीची असून ती जागा नाममात्र भाडेपट्टा तत्वावर दिली होती, मात्र त्याचा करार 2017 सालीच संपला आहे.ती जागा क्रीडांगण म्हणून वापरली जाणार असून, घडसोली मैदान सर्वांसाठी खुले केले जाईल, व तेथे सुसज्ज असे आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाचे मैदान उभारले जाईल असे आश्वासन देतानाच घणसोली मैदान नगर पालिकेला मिळवीण्यासाठी जी काही शासनस्तरावर किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे पूर्तता करावी लागेल त्यासाठी आमदार सचिन पाटील पुढाकार घेतील असा विश्वास माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.

    माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील हे गेली काही दिवस फलटण शहरातील नागरी सुविधा व अडीअडचणी समजून घेण्यासाठी तसेच त्याचा ताबडतोब पाठपुरावा करून समस्या सोडावीत आहेत त्याच अनुषंगाने  गुरुवार दि.2 जानेवारी रोजी प्रभाग क्रमांक 8 मधील नागरिकांना भेटण्यासाठी आले असता, घडसोली मैदान हे फलटण एज्युकेशन सोसायटीला फक्त एक रुपया भाडेपट्ट्याने दिले आहे व त्याचा करार हा 2017 सालीच संपला असल्याचे निदर्शनास आणून दिले, यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माहिती घेतली असता, त्यास नगर पालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी वस्तुस्थिती मांडली व तो करार संपला असल्याचे निवेदन केले,व त्यानंतर ताबडतोब हे मैदान पालिकेने ताब्यात घ्यावे अशा सूचना केल्या व त्यास शासनस्तरावर काही अडचणी आल्या तर आमदार सचिन पाटील सोडवण्यासाठी प्रयत्न करतील, या ठिकाणी सुसज्ज असे आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाचे मैदान उभारले जाईल व त्यासाठी लागणारा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देतील असे सांगितले.

    यावेळी आमदार सचिन पाटील यांनी सांगितले की उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाहीत असे आश्वस्त केले, यावेळी युवानेते रणजितसिंह भोसले (बाबा), अनुप शहा, युवानेते बबलू मोमीन, सुधीर अहिवळे,राजेंद्र काळे,संजय गायकवाड(महाराज), यांचेसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments