Breaking News

जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवाचे शानदार उद्घाटन, मुला मुलींच्या परिपूर्ण विकासासाठी क्रीडा स्पर्धा महत्वाच्या, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन

Grand opening of district level Chacha Nehru Balmahotsav

    सातारा दि. 9 : मुला-मुलींच्या शारिरीक, मानसिक विकासाबरोबर परिपूर्ण विकासासाठी क्रीडा स्पर्धा महत्वाच्या आहेत. अशा स्पर्धांमुळे त्यांच्यात सांघीक भवना वाढीस मदत होते, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले.

    येथील मुला-मुलींच्या निरीक्षण गृह/बालगृहात जिल्हास्तरीय चाचा नेहरु बालमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या हस्ते झाले. यावेळी महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) आनंदा खंडागळे, मुला मुलींच्या निरीक्षण गृह/ बालगृहाचे सचिव प्रदिप सांबळे, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा सुचित्रा काटकर, पत्रकार शरद काटकर, संरक्षण अधिकारी अजय सपकाळ, बाल न्याय मंडळाच्या सदस्या स्मिता जामदार, आदी उपस्थित होते.

    समाजात मोठे होण्यासाठी शिक्षणा शिवाय पर्याय नाही, असे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन म्हणाल्या, निरीक्षण/बाल गृहातील 18 वर्ष पूर्ण विविध क्षेत्रात काम करणार आहेत. आपल्या निरीक्षण गृहातील मुले मुली आपले भाऊ बहिणी आहेत त्यांच्या भविष्यासाठी सहकार्य करावे.

    बालगृहातील अनाथ, निराधार, उन्मार्गी, विधी संघर्षग्ररस्त मुला मुलींच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी चाचा नेहरु बाल महोत्सव मोलाची भूमिका बजावेल. क्रीडा स्पर्धांमध्ये विजय-पराजय होत असतो. निराश न होता निरीक्षण गृहातील मुला मुलींनी आपले संबंध चागले ठेवावेत, असेही मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी यावेळी सांगितले.

    यावेळी निरीक्षण गृह/ बालगृहाचे सचिव  श्री. साबळे म्हणाले, चाचा नेहरु बाल महोत्सव हा चांगला उपक्रम असून यामुळे निरीक्षण व बाल गृहातील मुले एका वेगळ्या वातावरनाचा आनंद घेतात.

    क्रीडा स्पर्धेत मुला मुलींनी कौशल्य पणाला लावून सहभाग घ्यावा, असे आवाहन बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा श्रीमती काटकर यांनी यावेळी केले.

    महिला व बाल विकास विभागामार्फत राज्यात बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 अन्वये बालगृहे कार्यरत असून या बालगृहात अनाथ, निराधार, उन्मार्गी, विधी संघर्षग्ररूस्त मुले/मुली दाखल आहेत. त्यांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना वाव मिळावा यासाठी जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या मुलांना शिक्षण, प्रशिक्षण अन्न वस्त्र निवारा यांची संपूर्ण व्यवस्था महिला व बाल विकास विभागामार्फत केली जाते. 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांचे पुनर्वसनही करण्यात येते. या महोत्सवामध्ये स्पर्धांमध्ये खो-खो, कबड्‌डी, क्रिकेट, 100 मिटर धावणे, रिले, गोळाफेक, थाळी फेक यासह विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याचेही प्रास्ताविकात महिला व बाल विकास अधिकारी श्री. तावरे यांनी सांगितले.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेंद्र सातपुते यांनी केले तर आभार प्रदर्शन अजय सपकाळ यांनी मानले.

    या कार्यक्रमास  महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक,शिक्षिका तसेच सातारा जिल्ह्यातील  निरीक्षण गृह/बालगृहातील मुले मुली उपस्थित होते.

No comments