राजे गटाच्या वतीने फलटण शहर व उत्तर कोरेगाव व फलटण तालुक्यातील महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.३१ - श्रीमंत सईबाई महाराज महिला नागरी सहकारी पतसंस्था, फलटण एज्युकेशन सोसायटी, जायंट्स ग्रुप ऑफ फलटण सहेली, गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टस व राजे ग्रुप फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२ फेब्रुवारी रोजी मुधोजी हायस्कूलच्या प्रांगणात फलटण शहरातील महिलांसाठी भव्य हळदी- कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
तर गोविंद मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्टस् प्रा.लि., श्रीमंत सईबाई महाराज महिला सहकारी पतसंस्था मर्या., फलटण., जायंटस् ग्रुप ऑफ फलटण सहेली. नरसोबा ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., कोळकी. यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण तालुका व उत्तर कोरेगांव मधील महिलांसाठी अनंत मंगल कार्यालय, कोळकी येथे भव्य हळदी- कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
No comments