ह.भ.प.श्रीमती कमल सदाशिवराव केंजळे यांचे निधन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.११ - ह.भ.प.श्रीमती कमल सदाशिवराव केंजळे (आक्का) वय ८८ यांचे आज दि ११/१/२०२५ रोजी बारामती येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे, परत्वंडे असा मोठा परिवार आहे.फलटण नगरपालिकेचे सेवानिवृत्त नगर अभियंता जीवन सदाशिवराव केंजळे (रावसाहेब) यांच्या त्या मातोश्री होत.
धार्मिक व सामाजिक कार्यात त्या नेहमी अग्रेसर असायच्या त्याच सोबत त्या वारकरी सांप्रदायाच्या अनुयायी म्हणून फलटण पंचक्रोशीत परिचित होत्या.त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे मोठ्या प्रमाणात त्यांची सर्वत्र ओळख होती. त्यांच्यावर फलटण येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
No comments